Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Promo: 'लग्न केले आहे, मी तुझा गुलाम नाही...' अंकिता-विकीमधील भांडणाने गाठले टोक

Bigg Boss 17: या प्रोमोमध्ये विकी आणि अंकिता पुन्हा भांडताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये मोठे ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. या घरात रोज वाद-विवाद पाहायला मिळतात. या विकेंडला औराचे इव्हिक्शन झाले. आता शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये विकी आणि अंकिता पुन्हा भांडताना दिसत आहे.

विकी जैन आणि मन्नारा चोप्रा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या मैत्रीचा अंकिताला त्रास होत असल्याचे अंकिताने अनेकदा आपल्या वागण्या-बोलण्यातून सांगतिले आहे. आत्ता झालेले भांडण हे मन्नारा आणि विकीच्या मैत्रीवरुनच झाले आहे.

आज अचानक मन्नारा आयुष्यात आली, तुला ती खूप आवडते, तिच्याबरोबर बोलायला तुला आवडते असे अंकिता म्हणताना दिसत आहे. त्यावर विकी अंकिताला उत्तर देताना म्हणतो की, त्यामध्ये वाईट काय आहे, चूकीचे काय आहे. काहीतरी लॉजिक किंवा कारण सांग ज्यामुळे मी मन्नाराबरोबर बोलू नये. तू अशाचप्रकारे माझ्या मित्रांना पळवून लावतेस असेही विकी म्हणताना दिसत आहे. हा वाद वाढतच जातो. अंकिता म्हणते, मी जर विचार करुन निर्णय घेतला असता तर हे सगळं झालंच नसतं. त्यावर विकी तिला म्हणतो, तू आजपर्यंत कोणता निर्णय विचार करुन घेतला आहेस. शेवटी विकी असेही म्हणतो की लग्न केले आहे तुझ्याबरोबर मी काही तुझा गुलाम नाही.

आता नवरा-बायकोचे हे भांडण कुठेपर्यंत जाणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी भावा-बहिणीच्या नात्याला अंकिता चूकीचा अँगल देत असल्याचे म्हटले आहे. कारण मन्नारा विकीला विक्की भाई म्हणते. अनेकांनी विकीला चूकीचे म्हटले आहे तर काहींनी मन्नारा नवरा-बायकोच्या मध्ये येत असल्याचे म्हटले आहे. आता अंकिता-विकीच्या भांडणावर मन्नारा काय प्रतिक्रिया देणार ? विकीबरोबरची मैत्री तशीच ठेवणार की त्याच्यापासूनपण दूर होणार हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे असणार आहे. याबरोबरच, या दोघांचे घरचे यावर काय म्हणणार हे पाहणेदेखील महत्वाचे आहे.

दरम्यान,अभिषेकला घरात पुन्हा एंट्री झाली आहे. त्यामुळे चाहत्यांचे मन जिंकून घेण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ लागली आहे. आता यंदाच्या बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT