Bigg Boss:16 Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 16 : 'बिग बॉस' मध्ये चक्क आई-बहिणीवरुन शिव्या..सलमान संतापला

Bigg Boss 16 मध्ये स्पर्धकांनी एकमेकांना आई- बहिणीवरुन शिव्या दिल्या आहेत. यावर सलमान कानउघडणी केली आहे.

Rahul sadolikar

बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शो मध्ये कधी काय होईल हे सांगणे मुश्कील असते. कधी कोण कुणाशी भिडेल आणि प्रेक्षकांना काय बघायला मिळेल काही सांगता येत नाही.

‘बिग बॉस १६’या शोमधले यावेळचे स्पर्धक चांगलेच शिवराळ असल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन होत चाललं आहे. घरातील स्पर्धकांनी अंकित गुप्ताला घराबाहेर काढल्याची बातमी आजच समोर आली आहे. वीकेंड का वार’ला सलमान स्पर्धकांना सूचना देत असतो.

साहजिकच ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान शालिन भानोत, एमसी स्टॅन आणि टिना दत्ता यांच्यात नॉमिनेशन टास्कवेळी झालेल्या भांडणावर बोलणार आहे.या भांडणावेळी सगळ्या सीमा ओलांडत शालिन भानोत, एमसी स्टॅन यांनी एकमेकांना आई-बहिणींवरून शिव्या दिल्याने सलमानने त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

प्रोमोमध्ये सलमान खूप रागावलेला दिसत होता आणि ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये नेहमी माफी मागितल्याबद्दल त्याने शालीनची खिल्लीही उडवली. लहान मुलासारखं वागणं बंद कर असंही सलमान त्याला म्हणाला.

तुमच्या आई आणि बहिणीला तुमच्या दोघांच्या वागण्याने त्रास सहन करावा लागतो. भांडणात तुम्ही त्यांना का वाईट बोलत आहात. तुमच्या बोलण्यावरुन तुमची पातळी किती खाली घसरलेली आहे ते कळतं असंही सलमान म्हणाला.

. एमसी आणि शालीनने दिलेल्या शिव्या पुन्हा द्या असं सलमान बोलतात दोघेही पुन्हा शिव्यांचा वापर करणार नाही असं म्हणुन माफी मागतात. आता बघुया विक-एंडला सलमान या दोघांना अजुन काय बोलणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT