Bharti Singh and Harsh Limbachiyaa Dainik Gomantak
मनोरंजन

Bharti Singh: संपूर्ण जगाला खळखळून हसायला लावणारी भारती सिंह मुलामुळे रडली; 'हे' आहे कारण

Bharti Singh: सध्या ती स्वत:च्या यु-ट्युब चॅनेलवरुन चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यामध्ये ती स्वत:च्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर कऱत असते.

दैनिक गोमन्तक

Bharti Singh: अनेक टीव्ही कलाकार प्रेक्षकांचे लाडके असतात. आपल्या अनोख्या अंदाजाने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली असते. त्यापैकी एक भारती सिंह ही आहे. द कपील शर्मा शो मधून तिने प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली.

सध्या ती स्वत:च्या यु-ट्युब चॅनेलवरुन चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यामध्ये ती स्वत:च्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर कऱत असते. आता एक व्हिडिओच्या दरम्यान ती रडताना दिसली होती. त्यानंतर ती चर्चांचा भाग बनली होती.

भारती सिंह ही आपल्या यु-ट्युब वर तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि मुलगा गोला यांच्याविषयीदेखील अनेक गोष्टी शेअर करत असते. आता तिने तिच्या मुलाला शाळेत पाठवायला सुरुवात केली आहे. तो शाळेत जाताना तिचे अश्रू अनावर झाल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

ती म्हणते-' गोलाला शाळेत पाठवत आहे. पण मला वाईट वाटतंय कि तो इतक्या लहाना वयात सगळं एकटं कसं करणार. तो शाळेत जातोय म्हणून छान वाटत आहे मात्र काळजी याची आहे की इतर मुलांनी त्याला मारलं, त्याला भूक लागली तर तो काय करेल. प्रत्येकजण वेगवेगळा सल्ला देतात. काहीजण म्हणतात की शाळेत जाण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि काहीजण म्हणतात की अजून तो लहान आहे. आपण मुलांना जन्म देतो आणि परत का रडतो असे ती म्हणताना दिसत आहे.

भारती एका व्हिडिओमध्ये असे म्हणत आहे की शिक्षक मुलांची काळजी घेत असल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शाळेत मुलांना प्रार्थनेपासून गिटार वाजवण्यापर्यंत सर्व काही शिकवले जाते. भारतीने सांगितले की, ती सध्या थोडी टेन्शन फ्री आहे. पण तिथे काय होत असेल याचा मला प्रश्न पडतो.

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया 3 डिसेंबर 2017 रोजी विवाहबद्ध झाले. 2022 मध्ये, ते मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव त्यांनी लक्ष ठेवले. लग्नापूर्वी भारती आणि हर्ष काही वर्षे एकमेकांना डेट करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT