Actress Bhumi Pednekar Dainik Gomantak
मनोरंजन

Bhakshak Trailer: तुम्ही स्वत:ला माणसात मोजता कि भक्षकामध्ये? भूमी पेडणेकरचा प्रश्न

Bhakshak Trailer Out : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट हे 9 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bhumi Pednekar's Bhakshak Trailer : भूमी पेडणेकर ही बॉलीवूडची अशी अभिनेत्री आहे, जी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. आता ती एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भक्षक असे या चित्रपटाचे नाव असून आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

तुम्ही स्वत:ला माणसामध्ये मोजता की भक्षकांमध्ये? असा प्रश्न भूमी विचारताना दिसत आहे. यामध्ये ती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसत असून बालिकागृहात मुलींबरोबर होणाऱ्या चूकीच्या वागणूकीबद्दल तिला माहित होते. त्या मुलींना त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि हे कोणामुळे होत आहे. हा भक्षक कोण आहे हे जगासमोर आणण्यासाठी ती प्रयत्न करताना दिसणार आहे.

हे सर्व बन्सी साहूच्या मार्गदर्शनाखाली घडते. त्याच्याकडे राजकीय ताकद आहे, पोलिसांनाही त्याच्या प्रकरणात ढवळाढवळ करत नाहीत. प्रत्येकजण त्याच्याशी जोडलेला आहे. शेवटी भूमी या 'भक्षकाला' कशी उघड करणार? हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित असल्याचे म्हटले आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट हे 9 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे.

शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पुलकितने याचे दिग्दर्शन केले आहे. गौरी खान आणि गौरव वर्मा हे निर्माते आहेत.

भूमीच्या कामाबद्दल बोलायचे तर गेल्या वर्षी भूमीचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये 'भिड', 'रुमर', 'थँक्स फॉर कमिंग' आणि 'द लेडी किलर' यांचा समावेश आहे. 'भसक'शिवाय 'मेरी पटनी का'च्या रिमेकमध्ये तो दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sindhudurg mystery case: रक्ताने माखलेली कार, कुजलेला मृतदेह; सिंधुदुर्गातील 'त्या' दोन गूढ घटनांमध्ये कनेक्शन काय?

Goa:'गोवा सागरी मंडळ स्थापन करा'! उद्योग महासंघ राज्य शाखेची मागणी; व्हीजन आराखडा प्रकाशित

'भाजपतर्फे हा एसटी समुदायावर केलेला थेट हल्ला'! सिद्धेश भगत यांचा दावा; दवर्ली - दिकरपाल सरपंच प्रकरणाचा तीव्र निषेध

Goa Live News: खोर्ली, म्हापसा येथील चार दुकाने केली सील

Mhadei River: 'म्हादई' प्रश्नी गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद! विधानसभा चिकित्सा समितीच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT