Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: ...अन् 'ती' म्हणाली शाहरुखसोबतचा तो शो माझ्या आयुष्यातील सगळ्यात फ्लॉप ठरला

Shahrukh Khan: दोघांनी हा शो होस्ट केला होता. 'झोर का झटका: टोटल वाइपआउट' असे या शोचे नाव होते.

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan: बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान प्रेक्षकांसोबतच मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचा आवडता अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. आता मात्र टीव्ही अभिनेत्री 'भाभीजी घर पे है' फेम सौम्या टंडनने शाहरुखसोबत होस्ट केलेला शो आयुष्यातील सगळ्यात फ्लॉफ शो असल्याचे वक्तव्य केले आहे.

सौम्या टंडनने शाहरुखसोबत रिअॅलिटी शोमध्ये काम केले होते. दोघांनी हा शो होस्ट केला होता. 'झोर का झटका: टोटल वाइपआउट' असे या शोचे नाव होते.

शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा तिला कळले की ती या किंग खानसोबत शो होस्ट करणार आहे, तेव्हा तिला वाटले की तिचे आयुष्य घडले आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे तो शो चालला नाही. 'हा शो माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप होता.' असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.

शाहरुखबद्दल ती पुढे म्हणते की, यादरम्यन शाहरुख खानसोबत खूप वेळ घालवला. 'मला त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली. तो सुद्धा अतिशय कुशाग्र आणि हुशार आहे. हा शो करण्यापूर्वी मी त्याचा फार मोठा चाहता नव्हते. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा माझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.'' सौम्याने शाहरुख खानचे कौतुक करताना आणि सांगितले की, जेव्हा ती त्याच्यासोबत तो शो करत होती तेव्हा अभिनेत्याने तिचा खूप आदर केला. आपण या क्षेत्रात नवीन आहोत असे तिला कधीच वाटले नाही.

दरम्यान, सौम्या टंडनला 'भाभीजी घर पर हैं' या प्रसिद्ध कॉमेडी मालिकेतून एक नवीन ओळख मिळाली आहे. काही लोक त्यांना 'जब वी मेट' चित्रपटातील रूप ढिल्लन म्हणूनही ओळखतात. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याव्यतिरिक्त, अभिनेत्रीने अनेक कार्यक्रमांमध्ये शो होस्ट करण्याचे काम केले आहे. याबरोबरच, शाहरुख खानने २०२३ मध्ये एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून दमदार कमबॅक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT