Vicky Kaushal and Katrina Kaif Dainik Gomantak
मनोरंजन

या कारणामुळे विकी-कॅटने ठेवले लग्नाचे सिक्रेट

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून सतत चर्चा होत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून सतत चर्चा होत आहे. दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नाशी संबंधित अनेक कारणांमुळे बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहेत. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची संख्या असो की मोबाईल फोन आणि व्हिडीओग्राफीवर बंदी. या स्टार कपलच्या लग्नाच्या अनेक अफवा आहेत.

दरम्यान, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नात सर्व पाहुण्यांना मोबाईल फोन वापरण्यास आणि व्हिडिओग्राफी करण्यास का बंदी घातली आहे, हे उघड झाले आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की हे दोघेही त्यांच्या लग्नाचे सर्व फोटो आणि फुटेज विकणार आहेत. त्यामुळे त्यांनी लग्नात मोबाईल फोन आणि व्हिडिओग्राफीवर बंदी घातली आहे.

आता अशी बातमी आहे की कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे फुटेज विकत घेण्यासाठी एका OTT प्लॅटफॉर्मने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. एवढेच नाही तर प्लॅटफॉर्मने त्यांना लग्नाच्या फुटेजसाठी मोठी रक्कम देऊ केली आहे. इंग्रजी वेबसाइट पिंकविलाच्या बातमीनुसार, एका OTT प्लॅटफॉर्मने कतरिना कैफ आणि विकी कौशलला त्यांच्या लग्नाचे फुटेज खरेदी करण्यासाठी 100 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या जवळच्या सूत्रांनी वेबसाइटला सांगितले की, "परदेशात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या लग्नाचे फुटेज आणि फोटो मॅगजीन किंवा चॅनेलला विकण्याचा ट्रेंड आहे. त्या स्टार्सचे अनेक चाहते आहेत जे त्यांच्या आवडत्या स्टार्सचे लग्न कसे झाले हे पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. असे काही ट्रेंड OTT प्लॅटफॉर्म भारतात आणत आहेत. त्यामुळे त्याने कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना 100 रुपयांची ऑफर दिली आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशलने ही ऑफर स्वीकारली की नाही याबद्दल शंका असली तरी. या दोघांच्या लग्नाची तयारी आणि विधी सुरू केले आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा संपूर्ण विवाह सोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत स्टार कपलचे संपूर्ण कुटुंब गडावर पोहोचले आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाहसोहळा 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर कतरिना कैफचा मेहंदी सोहळा 7 तारखेला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ काल म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मुंबईतील खाजगी विमानतळावर स्पॉट झाले होते. दोघेही त्यांच्या लग्नासाठी निघाले होते. दोघेही रात्री जयपूरला पोहोचले आणि आज त्यांच्या गडावर पोहोचतील. विशेष म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचा दिवस जवळ येत आहे. तसे पाहता चाहत्यांचा उत्साह वाढत चालला आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला 120 पाहुणे उपस्थित होते. लग्नाचे फोटो लीक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. पाहुण्यांना नॉन-डिक्लोजर करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे, ज्यात असे नमूद केले आहे की ते लग्न समारंभाला उपस्थित असताना इंटरनेट मीडियावर कोणताही व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करणार नाहीत. अतिथींना त्यांच्या नावाऐवजी वेगळ्या कोडने ओळखले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT