Netflix  Dainik Gomantak
मनोरंजन

Netflix Password: नेटफ्लिक्सचा लॉगिन आयडी, पासवर्ड शेअर करताय तर सावधान! आता द्यावे लागणार जादा शुल्क

गोमन्तक डिजिटल टीम

Netflix Password: ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करणाऱ्या युजर्सना आता अधिकचे शुल्क द्यावे लागणार आहे. कंपनीच्या संथगतीने वाढण्याचे सर्वात मोठे कारण हे पासवर्ड शेअरिंग हेच आहे, असे कंप्नीने म्हटले आहे. त्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते.

ओटीटी प्लॅटफॉर्म हेच भविष्य आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने 2023 च्या सुरवातीपासून लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर करणाऱ्या युजर्सकडून जादा शुल्क घेण्याचे ठरवले आहे.

नेटफ्लिक्सचा तिमाही अहवाल नुकताच आला आहे. या अहवालासोबत नेटफ्लिक्सने म्हटले आहे की, आम्ही अकाऊंट शेअरिंग करणाऱ्या युजर्सकडून जादा शुल्क घेण्याचे ठरवले आहे. 2023 च्या सुरवातीपासूनच अशा युजर्सकडून अतिरिक्त शुल्क घेतले जाईल.

अॅमेझॉन प्राईम, डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत नेटफ्लिक्स सबस्क्रायबर्सच्या संख्येत मागे पडल्याचे समोर आले होते. त्यावरून नेटफ्लिक्स इंडियाच्या धोरणांवरही टीका सुरू झाली होती. खरेतर नेटफ्लिक्सवर जितका कंटेट आहे, तितका कंटेट इतर कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मकडे नाही, पण अलीकडच्या काळात भारतीय प्रेक्षकांना समोर ठेऊन केलेल्या नेटफ्लिक्सच्या काही सीरीजना तितकासा प्रतिसाद लाभलेला नाही.

नेटफ्लिक्सचे प्रॉडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर चेंगई लॉन्ग म्हणाले की, मित्रमैत्रिणींमध्ये अकाऊंट शेअरिंग केल्यामुळे अनेकजण नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे युजर्सची संख्या वाढलेली नाही आणि कंपनीला तोटा होत आहे. ओटीटी प्लॅटफॉम हेच मनोरंजन क्षेत्राचे भविष्य आहे. दुसऱ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे मालिक स्वतःचे प्रॉडक्टचा विस्तार करण्यासाठी अब्जावधी रूपये खर्च करत आहेत. सध्या ते फायद्यात नाहीत. पण, भविष्यात त्यातून मोठा फायदा मिळणार आहे.

किती रूपयांचा असेल नेटफ्लिक्सचा नवा प्लॅन?

नेटफ्लिक्सच्या नव्या प्लॅन्सच्या किंमती आत्तापर्यंत जाहीर केलेल्या नाहीत, पण या किंमती मासिक 3 ते 4 डॉलरने वाढू शकतात. जे युजर्स अतिरिक्त शुल्क देऊ इच्छित नाहीत, ते नेटफ्लिक्सच्या मायग्रेशन टूलचा वापर करू शकतात. या टुलच्या मदतीने युजर्स अगदी सहजरित्या प्रोफाईल ट्रान्सफर करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT