Dev Kohli Passes Away  Dainik Gomantak
मनोरंजन

Dev Kohli Passes Away : ये काली काली आँखे, कबूतर जा जा लिहिणाऱ्या देव कोहलींनी घेतला अखेरचा श्वास

Rahul sadolikar

Lyricist Dev Kohli Dies at 80 : बाजीगर, मैने प्यार किया यांसारख्या चित्रपटांतील सुप्रसिद्ध रोमँटिक गाणी लिहिणारे ज्येष्ठ गीतका देव कोहली यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज (26 ऑगस्ट) दुपारी 2 वाजल्यापासून मुंबईतील ज्युपिटर अपार्टमेंट येथील त्यांच्या घरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमी येथे सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  चला पाहुया यासंदर्भातले सविस्तर वृत्त.

देव कोहलींची गाणी

अनु मलिक, आनंद राज आनंद, उत्तम सिंग आणि इतरांसह इंडस्ट्रीतील मित्रांना तसेच संगीतरसिकांना त्यांची 'पहला पहला प्यार' ही गाणी देव कोहलींची आठवण देत राहतील. 

देव कोहलींचा जन्म पाकिस्तानातील रावळपिंडी येथे झाला आणि त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी सुमारे शंभर गाणी लिहिली. त्यांनी ये काली काली आंखे, माये नी माये, आते जाते हंस्ते गाते, यासह काही हिट हिंदी गाणी दिली.

देव कोहलींनी केलेले चित्रपट

देव यांचे निकटवर्तीय, आनंद राज आनंद, अनु मलिक, उत्तम सिंग आणि बॉलिवूडमधील इतर मंडळी त्यांना अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.

देव कोहलीने 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'जुडवा 2', 'मुसाफिर', 'शूट आउट अॅट लोखंडवाला' आणि 'टॅक्सी नंबर 911' यांसारख्या 100 हून अधिक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज आनंद, आनंद मिलिंद आणि इतरांसारख्या संगीत दिग्दर्शकांसोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

लाल पत्थरची गाणी

राजकुमार - हेमा मालिनी स्टारर 'लाल पत्थर' (1971) मध्‍ये 'गीत गाता हूं मैं' हे त्यांचे लोकप्रिय गाणे आहे. गीतकार म्हणून हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. देव यांनी 'माये नी माये', 'ये काली काली आंखे', 'गीत गाता हूं', 'ओ साकी साकी' इत्यादी अनेक हिट गाण्यांसाठी खूपच कौतुक झाले आहे.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT