Sahdev Dirdo Dainik Gomantak
मनोरंजन

Video: 'बचपन का प्यार' गाणारा सहदेव पुन्हा चर्चेत; नवं गाणं ऐकाच

छत्तीसगडमधील सहदेव (Sahdev Dirdo) या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या व्हिडिओसाठी रातोरात प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये तो शाळेच्या गणवेशात 'बसपन का प्यार' हे गाणे गाताना दिसला होता.

दैनिक गोमन्तक

'बसपन का प्यार' (Bachpan ka pyar) या व्हायरल गाण्याने प्रसिद्ध झाल्यानंतर, छत्तीसगडच्या सहदेव दर्डोचे (Sahdev Dirdo) आणखी एक गाणे व्हायरल होत आहे. तो 'मनी हाईस्ट' मधून प्रतिष्ठित गीत बेला सियाओ (Bella Ciao) गाताना दिसतो. हा व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे आणि तो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'मनी हाईस्ट' मधील बेला सियाओ या आयकॉनिक गाण्याने आजकाल एक चर्चा निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी, वेब सीरिजसाठी सुरू असलेल्या क्रेझ दरम्यान, सुमारे 20 मुंबई पोलिस कॉन्स्टेबल्सनी हे लोकप्रिय गाणे विविध वाद्यांसह वाजवले. यानंतर, आता सहदेवची बेला सियाओ आवृत्ती प्रचंड व्हायरल होत आहे.

फेसबुक पेज 'देसी होमी' द्वारे शेअर केलेल्या या व्हिडिओला पोस्ट केल्याच्या काही तासांतच हजारो लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. सहदेवच्या प्रयत्नांचे अनेकजण कौतुक करत आहेत. इटालियन लोक गायक जियोव्हाना डॅफिनी यांनी बेला सियाओ हे गाणे 1962 मध्ये रेकॉर्ड केले.

सहदेव 'बचपन का प्यार' या गाण्याने झाला प्रसिद्ध

छत्तीसगडमधील सहदेव या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या व्हिडिओसाठी रातोरात प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये तो शाळेच्या गणवेशात 'बसपन का प्यार' हे गाणे गाताना दिसला होता. त्याचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की हिट रॅपर बादशाहने त्याच्यावर एक गाणे देखील तयार केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT