Bachchan Family Dainik Gomantak
मनोरंजन

Bachchan Family: कुटुंबात फूट पडल्याच्या चर्चांना बच्चन परिवाराने असे दिले उत्तर

Bachchan Family: इतकंच नाही तर ऐश्वर्याने सासरचं घर सोडून मामाच्या घरी शिफ्ट झाल्याचंही काहींनी म्हटलं आहे.

दैनिक गोमन्तक

Bachchan Family: गेल्या काही दिवसांपासून बच्चन परिवारात वाद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत म्हणजेच आराध्यासोबत बच्चन कुटुंबापासून दूर राहणार असल्याचे म्हटले जात होते. या चर्चांनंतर बच्चन कुटुंब एकत्र पाहायला मिळाले आहे.

प्रो कबड्डी लीगमध्ये जयपूर पिंक पँथर या संघाला चीअर करण्यासाठी बच्चन कुटुंब शनिवारी 6 जानेवारीच्या रात्री मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये पोहोचले होते. अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्यादेखील यावेळी दिसून आली.जयपूर पिंक पँथर्सचा सामना यू मुंबाशी झाला. यू मुंबा संघाने सामन्यात 31 गुण मिळवले. तर जयपूर पिंक पँथर्सने ४१ गुण मिळवून विजय मिळवल्यावर बच्चन कुटुंबाने आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

अभिषेक बच्चन बंटी वालियासोबत जयपूर पिंक पँथर्सचा सह-मालक आहे. या संघाने 2014 मध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. अभिषेक एका कार्यक्रमात त्याच्या लग्नाच्या अंगठीशिवाय दिसला तेव्हा ते घटस्फोट घेत आहेत या चर्चांना उधाण आले होते. इतकंच नाही तर ऐश्वर्याने सासरचं घर सोडून मामाच्या घरी शिफ्ट झाल्याचंही काहींनी म्हटलं आहे. मात्र बच्चन कुटुंबाला पुन्हा एकत्र पाहून या कुटुंबात नेमकं काय चालले आहे याचा अंदाज घेणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT