Dream Girl 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Dream Girl 2: 'आयुष्यमान खुराना'च्या ड्रीम गर्ल 2 ने केली गदरपेक्षा जास्त कमाई? चला पाहुया बॉक्स ऑफिस..

अभिनेता आयुष्यमान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 नुकताच रिलीज झाला असुन रिलीजनंतर चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Rahul sadolikar

Dream Girl 2 Box Office Collection Day 2 : गेल्या काही दिवसांपासुन बॉक्स ऑफिसवर गदर 2 या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याच वर्षी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या पठानने बॉलीवूडच्या वर्षाची चांगली सुरूवात केली होती.

या चित्रपटांसोबतच मनोरंजन विश्वात एका चित्रपटाची प्रतिक्षा चाहते करत होते ;आणि तो चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. आम्ही बोलतोय ड्रीम गर्ल 2 बद्दल.

राज शांडिल्य दिग्दर्शित, ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मानच्या 2019 च्या हिट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे. आयुष्मान खुराना व्यतिरिक्त या चित्रपटात अनन्या पांडे देखील आहे.

देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन

ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे, त्याच्या रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. 

Sacnilk.com नुसार , चित्रपटाने शनिवारी ₹ 14 कोटी कमावले, गदर 2 ने त्याच दिवशी कमावलेल्या कमाईपेक्षा ही कमाई जास्त आहे. गदरने रिलीजच्या 16 व्या दिवशी चांगली कमाई केली असली तरीही दुसऱ्या दिवशीच्या कमाईच्या स्पर्धेत ड्रीम गर्ल जिंकला आहे.

 सुरुवातीच्या अंदाजानुसार, सनी देओल स्टारर चित्रपटाने तिसऱ्या शनिवारी ₹ 12.5 कोटी कमावले .

चित्रपटाची कमाई

Sacnilk.com च्या मते, ड्रीम गर्ल 2 ने शुक्रवारी ₹ 10.69 कोटी कमावले. सुरुवातीच्या अंदाजानुसार ते ₹ 14 वर आले. चित्रपटाचे दोन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ₹ 24.69 कोटी इतके आहे. शनिवारी या चित्रपटाची एकूण 41.40 टक्के इतकी कमाई होती.

ड्रीम गर्लची भन्नाट स्टोरी लाईन

राज शांडिल्य दिग्दर्शित, ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मानच्या 2019 च्या याच शीर्षकाचा हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. आयुष्यमानने त्याची भूमिका पुन्हा त्याच जोमात केली.

चित्रपटातल्या या पात्राला प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पुरेसे पैसे कमवण्यासाठी पूजा बनण्याचा निर्णय घेतो. चित्रपटात अनन्या पांडेने भूमिका केली आहे.

ड्रीम गर्ल 2 मध्ये परेश रावल, अन्नू कपूर, राजपाल यादव, विजय राज, आसरानी, ​​अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंग आणि सीमा पाहवा देखील आहेत. याची निर्मिती एकता आर कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे.

आयुष्यमानचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर

एका प्रेस नोटमध्ये, निर्मात्यांनी सांगितले की हा चित्रपट आयुष्मानचा "आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर" ठरला आहे. आयुष्यमानच्या 2019 च्या बाला चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा ₹ 10.15 कोटी इतका होता. आयुष्मान म्हणाला की ड्रीम गर्ल 2 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली याचा मला आनंद आहे.

आयुष्यमान म्हणतो

"ड्रीम गर्ल 2 सोबत माझ्या कारकिर्दीची सर्वोत्कृष्ट सुरुवात करणे आश्चर्यकारक वाटते. ड्रीम गर्ल ही एक फ्रँचायझी आहे ज्याने मला खूप प्रेम दिले आहे आणि ड्रीम गर्ल 2 ने बॉक्स ऑफिसवर मिळवलेल्या सुरुवातीमुळे मी खरोखर आनंदी आहे," असं आयुष्यमानने तो पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आयुष्यमानची प्रेस नोट

"मनोरंजक म्हणून, लोकांना थिएटरमध्ये आणणे आणि त्यांना चांगला वेळ घालवण्याचा अनुभव घेणे आश्चर्यकारक वाटते.

ड्रीम गर्ल 2 हा एक चित्रपट आहे जो मनोरंजन प्रदान करतो. चित्रपट एक मोठे वचन देतो की लोक मनापासून हसतील आणि ते चांगले आहे.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT