Dream Girl 2 Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Dream Girl 2: ड्रीम गर्ल पूजाला रक्षाबंधनाच्या दिवशी मिळाली 7 कोटींची ओवाळणी...बॉक्स ऑफिस कलेक्शन

Rahul sadolikar

Dream Girl 2 Box Office Collection: अभिनेता आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. गदरचा जोर एकीकडे असताना ड्रीम गर्लने 100 कोटींच्या दिशेन वेगाने वाटचाल सुरू केली आहे.

ड्रीम याच नावाच्या चित्रपटाचा सिक्वेन्स सध्या प्रेक्षकांकडुन चांगलाच स्वीकारला गेलाय. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेची मुख्य भूमीका असणाऱ्या या चित्रपटाने रिलीजच्या सहा दिवसांत जवळपास ₹60 कोटी कमावले.

आठवड्याच्या शेवटी चांगली कमाई

रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्टला चित्रपटाने चांगली कमाई केली. ड्रीम गर्ल 2 ने रिलीजच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती आणि आठवड्याच्या शेवटीही चांगली कमाई सुरू ठेवली आहे. 

Sacnilk.com ने नोंदवलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार या चित्रपटाने रक्षाबंधनाच्या दिवशी ₹ 7.75 कोटी कमावले . रिलीजच्या सहा दिवसांनंतर चित्रपटाची एकुण कमाई  ₹ 59.75 कोटी इतका आहे .

ड्रीम गर्लचे ओपनिंग आणि एकुण कमाई

ड्रीम गर्ल 2 ने ₹ 10.7 कोटी इतकी कमाई करुन ओपनिंग केले होते आणि पहिल्या रविवारी ₹ 16 कोटी गोळा केले होते.

सोमवारी कलेक्शन ₹ 5.42 कोटींवर घसरले परंतु बुधवारी ₹ 7.75 कोटी कलेक्शनसह थोडी सुधारणा दिसून आली.

राज शांडिल्य दिग्दर्शित, हा चित्रपट 2019 च्या चित्रपटाच्याच ड्रीम गर्लचा सीक्वल आहे ज्यामध्ये आयुष्मान एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे जो स्त्री बनुन लोकांना भुरळ घालतो .

ड्रीम गर्ल 2 मध्ये, तो पूजाची नावाने लोकांना पैशासाठी फसवत असतो.

गदर आणि जवानच्या मध्यावर रिलीज

पहिल्या आठवड्यात ड्रीम गर्ल 2 च्या बॉक्स ऑफिसवरच्या अप्रतिम कामगिरीबद्दल बोलताना आयुष्मानने ANI ला सांगितले, "गेल्या 3 महिन्यांत मध्यम-बजेट आणि स्मॉल-बजेट चित्रपट देखील यशस्वीपणे चालू आहेत. पूर्वी लोकांना असे वाटायचे की फक्त मोठ्या बजेटचे चित्रपट चालतील.

आयुष्यमान पुढे म्हणतो, चित्रपटाची रिलीज होण्याची वेळ योग्य आहे. ड्रीम गर्ल जवान आणि गदर 2 या दोन्ही बिग बजेट चित्रपटांच्या मध्यावर रिलीज झाला मध्ये पण तरीही त्याने स्वतःची जागा निर्माण केली आणि ड्रीम गर्ल 2 चा हा सर्वात मोठा विजय असेल."

डायनासोरही बनेन

ऑन-स्क्रीन पूजाच्या भूमिकेबद्दल बोलताना आयुष्यमान म्हणतो, “जर कथा चांगली आणि प्रभावशाली असेल, तर फक्त मुलगीच नाही तर तुम्ही डायनासोर बनण्यास तयार व्हाल. अभिनेत्यांना खडतर आणि आव्हानात्मक काम करायचे असते.

 यापूर्वी कमल हासन सर, गोविंदा सर, आमिर खान सर या कलाकारांनीही स्त्री पात्रे साकारली आहेत, पण या भूमिकेसाठी माझी माधुरी, श्रीदेवी आणि हेमा मालिनी यांच्याशी स्पर्धा आहे. कारण मला वाटत होतं की या पुरुष कलाकारांना लक्षात ठेवलं तर मी न्याय देऊ शकणार नाही.”

अन्नू कपूर माझ्यासाठी लकी

ड्रीम गर्ल 2 मध्ये अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, विजय राज, राजपाल यादव, मनोज जोशी, आसरानी, ​​अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंग आणि सीमा पाहवा यांच्याही भूमिका आहेत. 

आयुष्मानने म्हटले आहे की अन्नू कपूर नेहमीच त्याच्यासाठी “लकी” ठरला आहे कारण त्याने त्याच्यासोबत ड्रीम गर्ल आणि विकी डोनर सारखे यशस्वी प्रोजेक्ट केले आहेत.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT