Shahrukh khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: अन् अ‍ॅटली झाला शाहरुखचा फॅन, म्हणाला 'मी जवानपेक्षा चांगल्या चित्रपटात किंग खानबरोबर...'

Shahrukh Khan: देव दयाळू आहे आणि मला वाटते की त्याने माझ्यासोबत न्याय केला आहे.

दैनिक गोमन्तक

Atlee wish work with Shahrukh Khan again

शाहरुख खानसोबत 'जवान' हा रेकॉर्डब्रेक चित्रपट बनवणाऱ्या एटलीला आता किंग खानसोबत आणखी एक चित्रपट बनवायचा आहे. तामिळ चित्रपट दिग्दर्शक ॲटली हा शाहरुखचा मोठा चाहता आहे आणि त्याला त्याच्यासोबत काम करण्याची नेहमीच इच्छा होती. 'जवान'मध्ये ही इच्छा पूर्ण झाली. मात्र एका मुलाखतीदरम्यान, ॲटलीने शाहरुखसोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ॲटलीने 'एबीपी कॉन्क्लेव्ह'मध्ये शाहरुख खानचे खूप कौतुक केले आणि त्याच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. आता तो 'जवान' पेक्षाही उत्तम विषय घेऊन तो शाहरुखसोबत करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

तो म्हणाला, 'मला त्याचे सर्व चित्रपट आवडतात, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'ओम शांती ओम', 'चेन्नई एक्स्प्रेस'... ही यादी मोठी आहे. माझ्यासाठी तो जगभरातील भारतीय चित्रपटांचा चेहरा आहे. शाहरुख सरांसोबत काम करणे हे एक स्वप्न आहे. सुदैवाने मला माझ्या पाचव्या चित्रपटात हे करण्याची संधी मिळाली. देव दयाळू आहे आणि मला वाटते की त्याने माझ्यासोबत न्याय केला आहे.

भविष्यात शाहरुख( ShahRukh Khan )सोबत पुन्हा काम करण्याची शक्यता आहे का, असे ॲटलीला विचारले असता तो म्हणाला, 'नक्कीच, मी पुन्हा त्याच्यासोबत काम करेन. मी 'जवान' पेक्षा चांगला विषय घेऊन येईन आणि त्याच्याकडे नक्की जाईन. शाहरुख सरांना आवडले तर आम्ही दोघे पुन्हा एकत्र काम करु. मला माहित आहे की तो माझ्यावर खूप प्रेम करतो. मी माझ्या आयुष्यात त्याच्यासारखा चांगला माणूस पाहिला नाही. धन्यवाद, शाहरुख सर.

दरम्यान, शाहरुखचा जवान बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता हे दोघे दिग्गज पुन्हा एकत्र दिसले तर कोणता विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

SCROLL FOR NEXT