Athiya Shetty and KL Rahul Dainik Gomantak
मनोरंजन

KL Rahul सोबतच्या लग्नाच्या बातम्यांवर मला हसू येत: अथिया शेट्टी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी तिच्या कथित नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) तिच्या कथित नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. यापूर्वी समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार असा दावा करण्यात आला होता की अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये लग्न गाठ बांधणार होते. त्याचवेळी आता अभिनेत्री अथिया शेट्टीने तिच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली. अलीकडेच एका मुलाखतीत, अभिनेत्रीने सांगितले की, अशा अफवा ऐकून ती त्यावर हसते. (Athiya Shetty has Silence is left on the news of her marriage to KL Rahul)

खरं तर, मागील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की अथिया आणि केएल राहुलने वांद्रे येथील एका बांधकामाधीन इमारतीत स्वतःसाठी एक घर बुक केले आहे. अशा परिस्थितीत आता या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना अथिया म्हणाली की, ती नवीन घरात जात आहे हे खरे आहे, पण ती तिचे आई-वडील सुनील शेट्टी आणि माना शेट्टी, भाऊ अहान शेट्टी यांच्यासोबत नवीन घरात शिफ्ट होते आहे.

या नवीन घरात मी आणि माझे कुटुंब एकत्र राहणार आहोत. आथिया आणि तिचे कुटुंब सध्या त्यांच्या दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोडच्या घरात राहत आहेत. यादरम्यान तिने केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या बातम्यांबद्दलही चर्चा केली. अथिया म्हणाली की, "मी यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाहीये. मी या सगळ्याला कंटाळले आहे, आता मी फक्त या बातम्यांची खिल्ली उडवत असते. लोकांना जे काही विचार करायचे आहे ते विचार करू द्यात."

यापूर्वीही अथियाचा भाऊ अहान यानेही अभिनेत्री आणि क्रिकेटरच्या लग्नाच्या अफवांचे खंडन केले होते. एका वेबसाईटशी बोलताना अहान म्हणाला होता की, "असा कोणताही समारंभ नाहीये, या सगळ्या अफवा आहेत. लग्नच नाही, तर आम्ही तुम्हाला डेट कशी देऊ? एंगेजमेंटही झालेली नाहीये. सध्या तरी असं काही नाहीये. कसलेही प्लॅन नाहीत. शिवाय पुढच्या महिन्यांत लग्नाचेही प्लॅन्सही नाही आहेत."

विशेष म्हणजे, अथिया आणि केएल राहुलच्या नात्याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगत आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहून लोक त्यांच्या नात्याबद्दल अंदाज लावत असतात. कामाच्या बाबतीमध्ये बोलायचे झाले तर, अथिया शेवटची 2019 मध्ये मोतीचूर चकनाचूर या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसून आली होती. त्याचबरोबर ती आत्ता सध्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

SCROLL FOR NEXT