Suniel Shetty - KL Rahul Instagram and X
मनोरंजन

Suniel Shetty: आण्णाला जावयाचे भारी कौतुक! केएल राहुलने शतक ठोकल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

KL Rahul Century: केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत शतक केल्यानंतर सुनील शेट्टी आणि अथिया शेट्टी यांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

Pranali Kodre

Athiya and Suniel Shetty reacted on KL Rahul Century during South Africa vs India Centurion Test:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डेला म्हणजेच 26 डिसेंबर रोजी सुरू झाला आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शतकी खेळी केली. याबद्दल त्याचे सध्या कौतुक होत आहे.

केएल राहुलचे कौतुक त्याची पत्नी अथिया शेट्टी आणि सासरे सुनील शेट्टी यांनीही केले आहे.

या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने 137 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या डावात भारताकडून त्याच्याव्यतिरिक्त कोणालाच 40 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला 240 धावांचा टप्पा पार करता आला.

दरम्यान, त्याने त्याचे शतक षटकार मारुन पूर्ण केले. हे त्याचे कारकिर्दीतील 8 वे कसोटी शतक आहे. त्याने हे शतक केलेला क्षण अभिनेते सुनील शेट्टी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून सोशल मीडियावरही शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये काही इमोजीही शेअर केल्या आहेत.

याशिवाय अभिनेत्री अथियाने इंस्टाग्राम स्टोरीवर केएल राहुलने शतक केल्यानंतरचा फोटो शेअर केला असून स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ असे कॅप्शन टाकले आहे. सध्या अथिया आणि सुनील शेट्टी यांच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. केएल राहुल आणि अथिया यांचे जानेवारी 2023 मध्ये लग्न झाले आहे.

Athiya and Suniel Shetty psot

भारतीय संघ पिछाडीवर

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 67.4 षटकात सर्वबाद 245 धावा केल्या. भारताकडून केएल राहुलच्या शतकाव्यतिरिक्त विराट कोहलीने 38 धावांची खेळी केली, तर श्रेयस अय्यरने 31 धावांची खेळी केली.

याशिवाय शार्दुल ठाकूरने 24 धावांची खेळी केली, तर यशस्वी जयस्वालने 17 धावा केल्या. याशिवाय कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आलेला नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच पदार्पणवीर नांद्र बर्गरने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मार्को यान्सिन आणि गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाखेर 66 षटकात 5 बाद 256 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गारने नाबाद 140 धावा केल्या आहेत. तसेच डेव्हिड बेडिंगहॅमने 56 धावांची खेळी केली.

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तसेच प्रसिध कृष्णाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

SCROLL FOR NEXT