Asur  Dainik Gomantak
मनोरंजन

Asur Upcoming Season: दोन्ही सिझनला मिळालेल्या प्रतिसादनंतर आता असुर 3 येतोय ? निर्मात्यांनी दिली मोठी हिंट..

Asur Upcoming Season: आता आसुरच्या या तिसऱ्या सीझनबद्दल मोठी माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Asur Upcoming Season: ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अग्रेसर दिसून येते. गेल्या काही काळापासून चित्रपटगृहांची जागा आता ओटीटी प्लॅटफॉर्म घेताना दिसून येत आहेत. थरारक, कॉमेडी अशा सगळ्या प्रकारचे शो आपल्याला एकाच ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे एक मोठा वर्ग प्रेक्षकांपासून निर्मात्यांपर्यत ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य देताना दिसून येत आहे.

ओटीटी वर प्रदर्शित झालेली आसुर ही वेबसीरीज आता पून्हा एकदा चर्चेत आली आहे. सस्पेंस आणि थ्रीलचा धमाका असलेल्या आसुरच्या पहिल्या दोन सीझनने प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. त्यामुळे चाहते आता आसुरच्या तिसऱ्या सीझन वाट पाहत आहेत. आता आसुरच्या या तिसऱ्या सीझनबद्दल मोठी माहीती समोर आली आहे.

आसुरच्या निर्मात्यांनी आता आसुर 3 कधी येणार किंवा येणार की नाही याबद्दल माहीती दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान, या शोचे प्रोड्यूसर आणि लेखक गौरव शुक्ला यांनी म्हटले आहे की, कोणत्याही शोचा नवीन सीझन बनवण्यासाठीचा निर्णय हा लोकांच्या दबातून घेतला जात नाही. ते तेव्हाच आसुर चा तिसरा भाग बनवतील जेव्हा त्यांना नवीन काही कल्पना सुचेल.

ज्या आयडियामुळे त्यांना आनंद वाटेल, पुढे ते म्हणतात मी क्रिएटिव्हिटी कायम ठेवण्यात विश्वास ठेवतो. मी असा कंटेट देऊ इच्छितो, ज्या कंटेटला मी लेखक म्हणून रिलेट करु शकेन आणि प्रेक्षक म्हणून देखील मला त्या कंटेटबरोबर रिलेट होता आले पाहिजे. त्यामुळे असा कंटेट मिळेपर्यत मी वाट पाहीन कारण जर आसुर 3 कधी आलाच तर तर मागच्या दोन सीझनसारखाच प्रेक्षकांच्या अपेक्षावर खरा उतरला पाहिजे.

आसुरच्या प्रोड्यूसरच्या या वक्तव्यामुळे प्रेक्षकांची ही इच्छा कधी पूर्ण होणार आणि काय असणार आसुरच्या तिसऱ्या सीझनची कहानी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आसुरच्या पहिल्या दोन भागात अरशद  वारसी आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT