Asur 2 First Look  Dainik Gomantak
मनोरंजन

Asur 2 First Look: पुन्हा एकदा रहस्यं अन् शिगेला जाणारी उत्सुकता, असुर 2 मधला अर्शदचा फर्स्ट लूक बघाच..

अभिनेता अर्शद वारसीचा असुर 2 या वेबसिरीजमधला फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

Asur 2 First Look: लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मानसिक अस्थिरतेच्या काळात ओटीटीने प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी दिली. पहिल्यांदाच लॉकडाऊन पाहणाऱ्या लोकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी तेव्हा ओटीटीवर येऊन पडली होती.

आणि याच काळात असूर नावाची एक वेब सिरीज रिलीज झाली आणि या वेब सिरीजने थरार आणि सस्पेन्स म्हणजे नेमकं काय हेच प्रेक्षकांना दाखवलं. आता या वेब सिरीजचा दुसरा भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

असुर या लोकप्रिय वेब सीरिजच्या निर्मात्यांनी अखेर शोच्या दुसऱ्या सीझनची रिलीज डेट जाहीर केली आहे. असुर 2 ही अर्शद वारसीची भूमिका असलेली वेब सिरीज, 1 जून रोजी JioCinema वर प्रीमियर होईल. अर्शद वारसी बरुण सोबती सोबत असूर 2 साठी पुन्हा एकत्र येणार आहे. 

आज बुधवारी (24 मे) संध्याकाळी शेअर केलेला फर्स्ट लूक प्रेक्षकांची उत्सुकता ताणवायला पुरेसा आहे. प्रोमोच्या सुरूवातीला "जगाला नवीन ऑर्डरची गरज आहे" असे सांगणारा आवाज येतो. 

एका भन्नाट सीनमध्ये, अर्शद आपली बंदूक एका व्यक्तीकडे दाखवतो आणि म्हणतो, “ तुम्ही तुमच्या देवाला उत्तरदायी आहात, मी कुणालाही उत्तरदायी नाही.”

हा एक मिनिटाचा व्हिडिओ सस्पेन्स निर्माण करतो आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतो की वेब सिरीजमधली "काळी बाजू" खरोखरच दुसऱ्या बाजूवर विजय मिळवेल का? आणि साहजिकच हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाची उत्सुकता निर्माण करतो.

असुरच्या पहिल्या सीझनमध्ये वारंवार वापरलेला मुखवटाही नवीन प्रोमोमध्ये अनेक वेळा दिसतो. शेवटी, निर्मात्यांनी पुन्हा एकदा अर्शदच्या म्हणजेच धनंजय राजपूतच्या काळ्या बाजूबद्दल काही सिग्नल्स प्रेक्षकांना दिले आहेत. 

बरुण सोबतीने साकारलेलं निखिल नायर हे पात्र धनंजयला म्हणजेच अर्शद वारसीला सांगतं, तुम्हाला न थांबवून मी वर्षांपूर्वी केलेली चूक पुन्हा करणार नाही.

या जगाला दुस-या राक्षसाची गरज नाही. हा डायलॉगचा अर्थ काय? आणि तो असं का म्हणतो या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल पण त्यासाठी तुम्हाला 1 जूनची वाट पाहावी लागणार आहे.

असुरचा पहिला सीझन

असूरचा पहिला सीझन VOOT वर प्रसारित झाला आणि 2020 तो मध्येच रिलीज झाला होता. पहिला सीजन गौरव शुक्ला, निरेन भट्ट, अभिजीत खुमान आणि प्रणय पटवर्धन यांनी सह-लेखन केला होता आणि त्याचे दिग्दर्शन ओनी सेन यांनी केले होते.

या दुसऱ्या सीजनमध्ये प्रेक्षकांना त्यांना पहिल्या सीजनमध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत.

अर्शद वारसी

अर्शदने मुन्नाभाई आणि इश्कियासह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजकुमार हिराणीच्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटांमध्ये अर्शदने सर्किटची भूमिका साकारली होती. मुन्ना भाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाईमध्ये संजय दत्तच्या या पात्रांनी प्रेक्षकांना एक वेगळी कलाकृती दिली होती. चाहते अजूनही या फ्रेंचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

त्याच्या कॉमिक गिग्स व्यतिरिक्त, अर्शदने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच गंभीर आणि ग्रे शेडच्या भूमिका देखील साकारल्या आहेत. 'सेहर' हे असेच एक उदाहरण आहे. 2005 चा हा चित्रपट त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT