asaduddin owaisi criticizes dhurandhar 2 movie Dainik Gomantak
मनोरंजन

Asaduddin Owaisi On Dhurandhar 2: 'मुसलमानांना शिव्या देणे गरजेचे आहे का?' ओवैसींचा 'धुरंधर 2' वर हल्लाबोल; चित्रपटाला म्हणाले 'बकवास'!

asaduddin owaisi criticizes dhurandhar 2 movie: 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत असतानाच राजकीय वर्तुळातून त्यावर टीकेची झोड उठू लागली आहे.

Sameer Amunekar

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत असतानाच राजकीय वर्तुळातून त्यावर टीकेची झोड उठू लागली आहे. एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या चित्रपटावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, याला निव्वळ 'बकवास' आणि 'प्रोपेगंडा' ठरवले आहे. विशेष म्हणजे, चित्रपट न पाहताच ओवैसींनी यातील आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ओवैसी यांनी चित्रपटाच्या लांबीवर आणि त्यातील संवादांवर टीका केली. "तीन तासांची बकवास पाहण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही," असे म्हणत त्यांनी या चित्रपटात हिंसाचार आणि शिवीगाळ असल्याचा दावा केला. ओवैसी पुढे म्हणाले की, "हा चित्रपट पाहिल्यानंतर मनात प्रश्न येतो की मुसलमानांना शिव्या देणे इतके गरजेचे आहे का? आम्ही हैदराबादमध्ये म्हणतो की, अशा गोष्टी मनावर घेऊ नका, तर त्या 'मुर्द्यावर' (प्रेतावर) सोडा. आम्हीही तेच करत आहोत." त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

विकिपीडियावर 'प्रोपेगंडा' शब्दाचा पाऊस

चित्रपटावरून सुरू झालेला हा वाद आता थेट माहितीचा स्रोत असलेल्या विकिपीडियापर्यंत पोहोचला आहे. 'धुरंधर २' च्या विकिपीडिया पेजवर तब्बल ३० वेळा 'प्रोपेगंडा' या शब्दाचा वापर करण्यात आला होता. हे प्रकरण इतके ताणले गेले की खुद्द विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांना यात हस्तक्षेप करावा लागला. वेल्स यांनी स्पष्ट केले की, प्रोपेगंडासारख्या शब्दांचा उल्लेख लेखात असू शकतो, मात्र विकिपीडिया स्वतःच्या आवाजात किंवा तथ्य (Fact) म्हणून असा दावा करू शकत नाही. सध्या विकिपीडियावर या चित्रपटाची व्याख्या 'हिंदी स्पाय ॲक्शन-थ्रिलर' अशीच करण्यात आली आहे.

बॉक्स ऑफिसवर ११०० कोटींचा टप्पा पार

टीका आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असला तरी, 'धुरंधर २' प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाने अवघ्या ९ दिवसांत जगभरात ११२८.९९ कोटी रुपयांचा ग्रॉस बिझनेस केला आहे. भारतात या चित्रपटाने ७१५.७२ कोटींचे नेट कलेक्शन केले असून, नवव्या दिवशी ४१.५५ कोटींची कमाई केली आहे. जरी नवव्या दिवशी कमाईचा वेग थोडा मंदावला असला, तरी चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT