Aryan Khan New Business Dainik Gomantak
मनोरंजन

Aryan Khan New Business: आर्यन खानचा नवा 'उद्योग'; घेऊन येतोय 'व्होडका'चा नवा ब्रँड

बॉलीवुडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याच्या निर्णयानंतर नवी घोषणा

Akshay Nirmale

Aryan Khan New Business : बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा नुकताच बॉलीवुडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार असल्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर आता आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेचे कारण आहे, आर्यनचा नवा बिझिनेस.

आर्यन चक्क मद्य उद्योगात उतरणार असून तो लवकरच व्होडका या मद्याचा नवा ब्रँड बाजारात आणणार आहे. नुकतचे आर्यनने स्वतःच तशी घोषणा केली आहे. त्यानुसार आर्यन खान भारतात प्रीमियम वोडका ब्रँड लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने जगातील सर्वात मोठी कंपनी AB InBev च्या भारतीय युनिटशी करार केला आहे.

आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. त्याने त्याच्या व्होडका ब्रँडचे नाव D'Yavol असे ठेवले आहे. या व्यवसायात बंटी सिंग आणि Leti Blagoeva हे त्याचे भागीदार असतील. आर्यनने D'Yavol ब्रँडचा लोगोही शेअर केला आहे.

आर्यनने नुकतेच त्याच्या एका वेबसीरीजची पटकथा पुर्ण केली होती. लेखक म्हणून त्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. शाहरुख आणि गौरी खान यांच्याच म्हणजेच घरच्याच प्रॉडक्शन हाऊसखाली या वेबसीरीजची निर्मिती केली जाणार आहे. सोशल मीडियात काही दिवसांपुर्वीच आर्यनने तशी पोस्ट केली होती आणि शाहरूख गौरीसह संपुर्ण बॉलीवुडमधून त्याला शुभेच्छांचे पाठबळ मिळाले होते.

आर्यनने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याला पाच वर्षे लागली. दरम्यान, आर्यन खान भविष्यात याच नावाने कपड्यांचा ब्रँड देखील लाँच करू शकतो. त्यात टी-शर्ट, हुडीज, जॅकेट आणि ब्लेझर विकले जातील. दरम्यान, एका फॅशन मॅगेझिनला दिलेल्या मुलाखतीत आर्यन म्हणाला होता की, कॅलिफोर्नियातील यूएससीमध्ये शिकत असताना त्याला ही कल्पना सुचली. वडील शाहरुख खान आणि आई गौरी खान माझ्या या व्यवसासायबाबत खूप आतुर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT