First movie of aryan khan in bollywood Dainik Gomantak
मनोरंजन

First Movie of Aryan Khan: दिग्दर्शनाआधीच आर्यन खानचे बॉलिवूडमध्ये झालय पदार्पण; जाणून घ्या एका क्लिकवर

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जन्म 13 नोव्हेंबर 1997 रोजी नवी दिल्ली येथे झाला. तो बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मोठा मुलगा आहे. मुस्लिम वडील आणि हिंदू आईसोबत वाढलेल्या आर्यनने दोन्ही धर्म स्वीकारले आहे.

 (First movie of Aryan Khan)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम...' मध्ये बालकलाकाराची भूमिका केली होती. या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर आर्यन खान 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटातही दिसला होता या चित्रपटात तो फुटबॉलपटू होता. याशिवाय आर्यन खान हा देखील डबिंग कलाकार असून त्याने लायन किंग चित्रपटात आपला आवाज दिला आहे. आर्यन खान देखील टाकोंडे चॅम्पियन आहे.

फिटनेस आणि क्रीडाप्रेमी आर्यन खान

आर्यन खान लहानपणापासूनच फिटनेस आणि क्रीडाप्रेमी आहे. त्याला मार्शल आर्ट्स आणि तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्टचे प्रशिक्षण दिले जाते. आर्यनने 2010 मध्ये महाराष्ट्र तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. इतर अनेक स्टार किड्सप्रमाणे आर्यन खाननेही परदेशात शिक्षण घेतले आहे. त्याने लंडनच्या सेव्हनॉक्समधून शालेय शिक्षण घेतले आणि नंतरचे शिक्षण दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले.

आर्यन खानची लव्ह लाईफ

आर्यन खान देखील त्याच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे. आर्यन खान बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत अनेकदा दिसला आहे आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप चर्चेत आल्या होत्या. सध्या आर्यन पैसे कमावत नाही शाहरुख खान आर्यन खानला त्याच्या खर्चासाठी दर महिन्याला 15 ते 20 कोटी रुपये देतो. आर्यन खानच्या नावावर सध्या तीन अत्यंत महागडे आणि आलिशान घरे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

SCROLL FOR NEXT