Aryan Khan granted bail but when he meet to Shah Rukh & Gauri Khan
Aryan Khan granted bail but when he meet to Shah Rukh & Gauri Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Aryan Khan आज मन्नत वर? की माय लेकराची भेट आजही टाळणार

दैनिक गोमन्तक

मुंबई क्रूज (Mumbai Cruse Case) प्रकरणात काल आर्यन खानला (Aryan Khan) जमीन मिळाल्यानंतर अखेर शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या स्टार किडला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) 2 ऑक्टोबर रोजी एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर ताब्यात घेतले होते आणि 3 ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली होती. 7 ऑक्टोबर रोजी त्याला अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांसारख्या इतरांसह न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.(Aryan Khan granted bail but when he meet to Shah Rukh & Gauri Khan)

विशेष एनडीपीएस न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर वकिलांनी त्याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयात तीन दिवस युक्तिवाद केल्यानंतर त्यांला जामीन मंजूर करण्यात आला. आता त्याच्या वकिलांनी आर्यन लवकरच आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडेल अशी माहिती दिली आहे.जामीनानंतर वकील मुकुल रोहतगी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांना तीन दिवसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला आहे. उद्या सविस्तर आदेश दिला जाईल. उद्या किंवा शनिवारपर्यंत सर्वजण तुरुंगातून बाहेर येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

अनेक वेळा जामिनासाठी अर्ज करून देखील आर्यन खानला दिलासा मिळत नव्हता या स्टार किडने प्रथम 4 ऑक्टोबर रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर 8 ऑक्टोबर तसेच 20 ऑक्टोबर रोजी जामीन सुनावणीनंतर त्याला जामीन नाकारण्यात आला होता. माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी शाहरुखच्या मुलाच्या खटल्यात युक्तिवाद करत होते.पण जमीन न मिळाल्याने शाहरुख खान आणि गौरी खान चिंतेत होते. शाहरुख ने तर आपला वाढदिवस साजरा ना करण्याचा निर्णय देखील घेतला होता.

पण आता अखेर जमीन मिळाला असला तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगातच राहावे लागणार आहे. त्यामुळे ही सारी प्रक्रिया कधी पूर्ण होईल आणि आर्यन खान अप्लाय मन्नत वर येऊन कधी आपल्या आई बापाला भेटेल याचीच वाट सारे चाहते पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: गोव्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीवर पाकिस्तानचं भाष्य; परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या म्हणाल्या, ''भारतीय राजकारण्यांनी...''

Panaji News : भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

Mark Zuckerberg यांचा पगार फक्त 83 रुपये, पण सुरक्षेवर होतो कोट्यवधींचा खर्च; उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब पाहून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT