Arman Malik Dainik Gomantak
मनोरंजन

Arman Malik : कहर...एकाच वेळी दोन पत्नी गरोदर, युट्यूबर अरमान मलीकने एकत्रच केले डोहाळे जेवण

आजकाल कुठली अतरंगी बातमी समोर येईल सांंगणं मुश्कील आहे..आता युट्यूबर अरमान मलीकचंच बघा ना..

Rahul sadolikar

आजकाल सोशल मिडीयावर काय बघायला मिळेल आणि लोक काय करतील हे सांगणं मुश्कील आहे. वेगवेगळे अतरंगी व्हिडीओ आणि मिम्स तर आपण बघत असतोच आता एक अतरंगी वाटणारी बातमीही वाचा...

युट्युबर अरमान मलिक काही काळापासून चर्चेत आहे कारण त्याला दोन बायका आहेत आणि दोघी एकाच वेळी गरोदर आहेत. बर्‍याच ट्रोलिंगचा सामना करणार्‍या या YouTuberने आपल्या दोन्ही गर्भवती पत्नी कृतिका मलिक आणि पायल मलिक यांच्यासाठी 'डोहोळे जेवणाचा ' कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

YouTube हे कमाईचे एक उत्तम साधन आहे आणि या प्लॅटफॉर्मवर अनेक क्रिएटर आहेत जे व्हिडिओ तयार करतात आणि शेअर करतात आणि त्याआधारे पैसे कमावतात. असाच एक YouTuber आहे अरमान मलिक ज्याचा कंटेंट खूप अनोखा आहे कारण तो स्वतः खूप वेगळा आहे.   रमान मलिक चर्चेत राहतो कारण त्याला दोन बायका आहेत आणि त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघी एकत्र प्रेग्नंट झाल्या आहेत. 

अरमानने त्याच्या गर्भवती पत्नींसाठी खास डोहाळे जेवण ठेवले होते , ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. हे फोटो बघुन नेटिझन्सच्या भुवया उंचावल्या आहेत.

 अरमान मलिकने त्याच्या पत्नींसाठी एक नव्हे तर दोन बेबी शॉवर फंक्शन्स आयोजित केले होते, ज्यामध्ये पायल आणि कृतिकाने पहिल्या फंक्शनमध्ये जांभळ्या रंगाचे मॅचिंग लेहेंगा परिधान केले होते; दोघीही गरोदर आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही कृतिका आणि पायल आणि त्यांचा पती अरमान मलिकसोबत पोज देताना पाहू शकता. दोघांचाही लूक सारखाच आहे.  

कृतिका आणि पायल पहिल्या बेबी शॉवर फंक्शनमध्ये जांभळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये एकसारख्याच दिसत आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्या बाळाच्या शॉवरसाठीही दोघीही हिरव्या रंगाच्या लेहेंगामध्ये पोज देत होत्या. इथेही लेहेंगा आणि दोघांचा संपूर्ण लुक सारखाच आहे. पहिल्या फंक्शनमध्ये अरमानने काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता, तर दुसऱ्या फंक्शनमध्ये त्याच्या कुर्त्याचा रंग पिवळा होता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Astrology Today: बुधादित्य योगामुळे धनलाभ आणि नव्या संधी; वृषभ, मिथुनराशीसोबत 'या' लोकांसाठी अत्यंत लाभदायक दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहाला ‘मानवाधिकार’ने फटकारले! शौचालयांमध्ये दरवाजांचा अभाव; जॅमरसह सीसीटीव्‍हींची शिफारस

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

Goa live News: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या नवीन अधीक्षक म्हणून सुचेता बी. देसाई यांची नियुक्ती

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT