Arjun Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

'चुप रहकर गलती की...' Boycott ट्रेंडवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया, झाला ट्रोल

दैनिक गोमन्तक

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलीवूडचा ट्रेंड सुरू आहे. ज्याचा परिणाम नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.बॉलीवूडच्या बहिष्काराच्या ट्रेंडने चित्रपटसृष्टी आणखी चिंतेत टाकली आहे. आता अभिनेता अर्जुन कपूरने बहिष्काराच्या या ट्रेंडवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.(Arjun Kapoor Reaction On Boycott)

बॉलीवूड हंगामामध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान अर्जुनला (Arjun Kapoor) बॉलीवूडच्या बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता,तेव्हा अर्जुनने तिव्र प्रतिक्रिया दिली होती. अर्जुन कपूर म्हणाला की, मला वाटतं आपण त्याबद्दल गप्प राहून खूप मोठी चूक केली आहे आणि ही आमची शालीनता होती पण लोकांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे.

* खूप सहन केले

त्याने पुढे म्हटले की मला वाटते की आपले काम स्वतःच बोलेल असा विचार करून आपण चूक केली आहे. इतकंच नाही तर अर्जुनने तिखट शब्दात पुढे म्हटलं की, तुम्हाला माहीत आहे की कधी कधी तुम्हाला नेहमीच हात घाण करण्याची गरज नसते पण मला वाटतं की आम्ही ते खूप सहन केलं आणि आता लोकांनी ही सवय करून घेतली आहे.

* आता खूप होत आहे

अर्जुन कपूर एवढ्यावरच थांबला नाही, तो पुढे म्हणाला की, आता इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र येऊन यावर मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. कारण लोक त्याच्याबद्दल जे लिहितात ते सत्यापासून दूर आहे.तो पुढे म्हणाला की, जेव्हा आपण असे चित्रपट (Movie) करतो, जे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात, तेव्हा लोकांना ते आपल्या नावामुळे नाही तर चित्रपटामुळे आवडतात. बहिष्काराबद्दल अर्जुन म्हणाला की, हे खूप होत आहे जे चुकीचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT