A.R Rehman  Dainik Gomantak
मनोरंजन

A.R Rehman On Remix: 'विकृत, विचित्र' ए.आर. रहमान रिमिक्स संस्कृतीवर भडकला

फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यातील वाद शिगेला

गोमन्तक डिजिटल टीम

नेहा कक्कडने फाल्गुनी पाठक यांच्या 90 च्या दशकातील सुपर हिट गाणे ‘मैंने पायल है छनकाई.. या गाण्याचे रिमिक्स केले आहे. यावरून नेहा कक्कड (Neha Kakkar) आणि फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्यात शाब्दिक वाद पहायला मिळाला. यावर सोना मोहपात्रा यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. यात आता ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रहमान (A.R. Rahman) यांनी उडी घेतली असून, रिमिक्स संस्कृती 'विकृत, विचित्र' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संगीतकार, गायक ए. आर. रहमान यांना एका संभाषणादरम्यान रिमिक्स बाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर रहमान चांगलेच संतापले. ए. आर. रहमान म्हणाले, रिमिक्स गाण्यांमुळे संगीतकाराचे लक्ष विचलित होते. लोकं म्हणतात आम्ही गाण्याची पुनर्कल्पना केली आहे. गाण्याची पुन्हा कल्पना करणारे तुम्ही कोण आहात? मी स्वतः नेहमी दुसऱ्याच्या कामाची काळजी घेत असतो. तुम्हाला इतरांच्या कामाचा आदर करावा लागतो.”

दरम्यान, गायिका फाल्गुनी पाठक यांच्या ‘मैंने पायल है छनकाई’ या गाण्याचा नेहाने ‘ओ सजना’ (O Sajna) असं रिमेक गाणं बनवलं आहे. हा रिमेक नेटकऱ्यांना अजिबात आवडला नसून, नेटकरी नेहाला ट्रोल करत आहेत. फाल्गुनीसुद्धा नेहावर आपला रोष व्यक्त करत आहे. “गाण्यांचे रिमेक बनवा, पण चांगल्या पद्धतीने बनवा. सध्या रिमिक्सचा जमाना आहे. काही गाणी चांगली बनवली गेली आहेत. अशी गाणी आम्ही स्टेजवरसुद्धा गातो. रिमिक्स बनवताना त्या गाण्याची वाट लावू नका. तुम्ही फालतू रिमेक का बनवता?” असे फाल्गुनी पाठक यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

फाल्गुनी पाठक पुढे म्हणाल्या, '2000 मध्ये मैंने पायल है छनकाई हे माझं गाणं प्रदर्शित झालं होतं. आजसुद्धा हे गाणं लोकप्रिय आहे. 2000 मध्ये माझ्यावर जेवढा कौतुकाचा वर्षाव झाला होता, तेवढात आजही होतो. त्याला रिक्रिएट करायचं असेल तर करा, त्याला रिदम वेगळा द्या, मॉडर्न टच द्या. आणि एक चांगला रिमेक बनवा. मूळ गाण्याचे सौंदर्य नष्ट करू नका.'

दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर सोनी टीव्हीकडून (Sony TV) नेहा आणि फाल्गुनी यांचा एक प्रोमो शेअर केला होता. यात इंडियन आयडॉलच्या सेटवर नेहा कक्कर फाल्गुनी पाठक यांच स्वागत करताना दिसत आहे. पण, हा एपिसोड वादाच्या खूप आधी शूट करण्यात आला होता. फक्त त्याचा व्हिडीओ आता प्रदर्शित केला गेल्याचं म्हटलं जात आहे. तसेच, हा पब्लिसिटी असल्याचेही बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

SCROLL FOR NEXT