Virat Kohli - Anushka Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

अनुष्का शर्माची प्रेग्नन्सी कन्फर्म... विराटसोबतचा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच

अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचे खात्रीशीर वृत्त समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सोशल मिडीयावर होत होत्या.

Rahul sadolikar

Virat kohli anushka sharma viral video on social media : सध्या क्रिकेट विश्वचषकाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. भारताचा तुफानी फलंदाज विराट कोहलीही एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या बंगळुरूमध्ये आहे. खरंतर दोघांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे चाहत्यांनी दोघेही लवकरच गोड बातमी देणार आहेत

व्हायरल व्हिडीओ

अनुष्का शर्मा-विराट कोहली व्हायरल व्हिडिओ स्टार कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे ग्लॅमर जगतातील सर्वात आवडते जोडपे आहेत. सध्या अनुष्का आणि विराट विश्वचषकाच्या सामन्यासाठी बेंगळुरूमध्ये आहेत. 

अनुष्का आणि विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही हात हातात धरलेले दिसत आहेत. विरुष्काचे चाहते व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बेबी बंप दिसला

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान अनुष्काही लाइमलाइटपासून अंतर राखत आहे. नुकतीच ती बंगळुरूमध्ये पती विराट कोहलीसोबत दिसली . यादरम्यान लोकांच्या नजरा अभिनेत्रीच्या बेबी बंपवर गेल्या. 

भारत विरुद्ध नेदरलँड

अनुष्का शर्मा तिचा क्रिकेटर पती विराट कोहलीला चिअर-अप करण्यासाठी बंगळुरूला गेली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक सामना नेदरलँड्स सोबत बेंगळुरू येथे (१२ नोव्हेंबर) रोजी होणार आहे. सामन्यापूर्वी हे जोडपे एकत्र फिरताना दिसले होते, त्यानंतर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बंगळुरूमध्ये झाले स्पॉट

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतेच बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. विराट आणि अनुष्का हातात हात घालून फिरताना दिसले. यादरम्यान सर्वांच्या नजरा अनुष्का शर्माच्या बेबी बंपवर पडल्या. काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये लोकांना अनुष्काचा बेबी बंप दिसला. लूज ब्लॅक ड्रेसमध्ये अनुष्काचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. 

अनुष्काचा व्हिडीओ व्हायरल

अनुष्का शर्माचा व्हिडिओ पाहून लोकही ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत. एका यूजरने म्हटले की, 'ती प्रेग्नंट आहे. मला वाटते की दोघेही विश्वचषकानंतर घोषणा करतील. एका यूजरने 'ती प्रेग्नंट आहे' असे म्हटले आहे. एकाने सांगितले, 'तिच्या पहिल्या गरोदरपणातही ती अशीच दिसत होती.' एका चाहत्याने 'वर्ल्ड कप येणार आणि बाळाही.' तसेच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

Goa Live News: मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

Konkan Railway: आरक्षित डब्बा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

SCROLL FOR NEXT