Anushka Sharma| virat kohli |Vaamika Dainik Gomantak
मनोरंजन

अनुष्का शर्माने वामिकाला खास वचन देत शेअर केला फोटो

Anushka Sharma Instagram Post: अनुष्का शर्माने एक इंस्टाग्रामवर खास पोस्ट केला आहे जो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली सध्या मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहेत. अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनुष्काने तिची मुलगी वामिकासाठी पोस्ट केलेली इंस्टाग्राम स्टोरी सर्वांचे मन जिंकत आहे. विराट आणि अनुष्का दोघेही त्यांच्या इंस्टाग्रामवर मालदीवचे सुंदर फोटो शेअर करत आहेत. (Anushka Sharma Special Promise Daughter Vaamika News)

अनुष्काने इन्स्टा स्टोरीमध्ये वामिकाच्या स्ट्रोलरचा फोटो शेअर करत त्यावर एक हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये अनुष्काने (Anushka Sharma) वामिकाला गोड वचनही दिले आहे. या पोस्टसोबत (Post) तिने लिहिले की, मी तुला नेहमी या जगाच्या पलीकडे घेऊन जाईन, तू माझे जीवन आहेस, या फोटोमध्ये वामिका दिसत नसली तरी अनुष्काने तिच्या नावासोबत वामिकाचे (Vaamika) नाव आणि हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.

Anushka Sharma

आतापर्यंत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी वामिकाला मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवले आहे. सोशल मीडियावरही (Social Media) दोघांनी त्यांची फक्त झलक दाखवली आहे. वामिकाच्या जन्मानंतर विराट आणि अनुष्का या दोघांनी पापाराझींसोबत भेट घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीचा फोटो शेअर करणार नाही अशी अट ठेवली होती. योग्य वेळ आल्यावर दोघेही आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांसोबत शेअर करतील. असे त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT