Kennedy Poster Release Dainik Gomantak
मनोरंजन

Kennedy Poster Release: अनुराग कश्यपचा 'केनेडी' सांगणार मेलेल्या पोलिसाची गोष्ट...पोस्टर रिलीज

दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केनेडी या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.

Rahul sadolikar

Kennedy Poster Release: "डोळे आणि कान उघडे ठेवा केनेडी येत आहे" असं म्हणत दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'केनेडी' या चित्रपटाचे पोस्टर पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

वेगवेगळ्या परिस्थितीत अडकलेल्या एका त्रस्त माजी पोलिसाची कथा केनेडी तुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे. 'केनेडी'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. 

हे पोस्टर पाहुन नक्कीच प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले असतील ;कारण चित्रपटाच्या पोस्टरवरुन त्याच्या कथेची कल्पना येत नाही. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये 'मिडनाईट स्क्रीनिंग' कॅटेगिरीमध्ये या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

केनेडी ही एका माजी पोलिसाची कथा आहे जो झोपत नाही. प्रदीर्घ काळापासून मृत गृहीत धरून, तो अजूनही भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात काम करतोय आणि गोष्टी शोधत आहे. 

चित्रपटाच्या रिलीज पहिले पोस्टर करण्यात आले आहे, ज्यामध्ये मुख्य अभिनेता राहुल भट मुखवटा घातलेला आहे आणि सनी लिओनी दरवाजासमोर उभी आहे आणि ओरडत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत.

यात कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि यावेळी अनुराग काय नवीन घेऊन येत आहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

'केनेडी'ची निर्मिती झी स्टुडिओज आणि गुड बॅड फिल्म्सचे रंजन सिंग आणि कबीर आहुजा यांनी केली आहे. चित्रपटाचा DOP सिल्वेस्टर फोन्सेका आहे. आशिष नरुला, आमिर अझीझ आणि बॉयब्लँक यांनी संगीत दिले आहे. 

चित्रपटाचे एडिटिंग तान्या छाब्रिया आणि दीपक कत्तर यांनी केले असून साउंड डिझाईन कुणाल शर्मा आणि डॉ. अक्षय इंडीकर यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT