Anurag Kashyap Dainik Gomantak
मनोरंजन

Anurag Kashyap: '...अन् लोक माझे चित्रपट लपूनछपून बघायचे' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा

Anurag Kashyap: 'दॅट गर्ल इन यलो बूट्स' रिलिज झाल्यानंतर माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण झाले होते.

दैनिक गोमन्तक

Anurag Kashyap: बॉलीवूडचे कलाकारांच्या आयुष्याचा काही भाग सर्वांसमोर येतो. तर काही आयुष्य नेहमी पडद्यामागे राहते. कधी ते आयुष्य त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून तर कधी एखाद्या मुलाखतीतून समोर येते.

आता बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्ल सांगितले आहे. माझी ओळख पॉर्न साठी होती. लोक मला त्यासाठी ओळखायचे. जेव्हा लोक मला म्हणायचे मी तुमचे चित्रपट पाहिले आहेत. लोक माझे लपूनछपून चित्रपट पाहायचे. 'दॅट गर्ल इन यलो बूट्स' रिलिज झाल्यानंतर माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण झाले होते. हा कसला माणूस आहे ? असे लोक मला म्हणत असत.

या मुलाखतीदरम्यान, त्याच्या अनुराग न रिलीज झालेल्या 'पांच' चित्रपटाबद्दल बोलत होता, तेव्हा त्याने या चित्रपटाची आठवण सांगितली आहे. तो म्हणतो की लोकांनी त्याच्या व्यक्तिरेखेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

अनुरागचा पहिला चित्रपट 'पांच' चित्रपगृहात प्रदर्शित झाला नाही. मात्र चित्रपट ऑनलाइन उपलब्ध आहे. 'पाच'मध्ये के के मेनन, विजय मौर्य, आदित्य श्रीवास्तव, तेजस्विनी कोल्हापुरे आणि जॉय फर्नांडिस यांचा समावेश होता.

'दॅट गर्ल इन येलो बूट्स' मध्ये कल्की कोचलिन आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत आणि 2011 मध्ये रिलीज झाला होता. यात गुलशन देवैयाचीही भूमिका आहे. पियुष मिश्रा आणि रजत कपूर यांनीही चित्रपटात कॅमिओ केला होता.

दरम्यान, अनुरागचा नुकताच 'हड्डी' हा चित्रपट रिलिज झाला आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी एक ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसून येत आहे . अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात मोहम्मद झीशान अय्युब देखील आहेत. 'हड्डी'पूर्वी अनुराग 'धूमकेतू', 'अकिरा', 'दास देव', 'डॉग्स' आणि 'इमाइक्का नोडिगल' या तमिळ चित्रपटासह काही चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT