IFFI 2022 | Goa| Anupam kher Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 2022: गोव्यात 'द काश्मीर फाइल्स'चे स्क्रीनिंगला अनुपम खेर यांची हजेरी, सेल्‍फी काढण्‍यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड

Goa IFFI 53rd News: गोव्यात सुरू असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अनुपम खेर यांनी हजेरी लावली होती.

दैनिक गोमन्तक

गोव्यात सुरू असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दररोज अनेक चित्रपटांची झलक पाहायला मिळत आहे. इफ्फीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय सिनेमा ब्लॉकबस्टर चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चे स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी प्रख्यात अभिनेते अनुपम खेर आणि इतर कलाकारांनी उपस्थित होते.

द काश्मीर फाइल्सच्या (The Kashmir Files) स्क्रीनिंगबद्दल आनंद व्यक्त करताना अनुपम खेर म्हणाले, “इफ्फीच्या (IFFI53) 53 व्या आवृत्तीत द काश्मीर फाइल्सचे प्रतिनिधित्व करताना खूप छान वाटत आहे. गेल्या 38 वर्षात मी या महोत्सवात सहभागी होतोय. चित्रपटात घेतलेल्या कठोर परिश्रमाबद्दल आणि प्रतिभेच्या चमकदार प्रदर्शनासाठी सर्वांचे अभिनंदन.

  • हा चित्रपट मार्चमध्ये रिलीज झाला होता

विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाइ केली होती. 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीस काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्याकांड आणि एका समुदायाने केलेले अत्याचार या चित्रपटात (Movie) वर्णन केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अनुपम खेर यांनी सोशल मिडियावर इफ्फीचे काही फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) शेअर केले आहे. या फोटोमध्ये चाहत्यासह सेल्फी काढतांना दिसत आहे. द काश्मिर फाईल्स'चा सीक्वेल पुढील वर्षी रीलीज होण्याची शक्यता आहे अशी माहिती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT