Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande: अंकिता-विकीच्या लग्नावर पुन्हा प्रश्नचिन्ह! सलमान अभिनेत्रीच्या सासूवरच भडकला

Bigg Boss 17 Promo: आता नव्या प्रोमोमध्ये सलमान खानसमोर त्याचे कुटुंबीय आले आणि त्यांच्या नात्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Promo: 'बिग बॉस 17' च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात आणखी एक मोठा वाद झाला. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या चाहत्यांनी शोमध्ये त्यांच्या घटस्फोटाची चर्चा केली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहेत. मन्नारा चोप्रामुळे अभिनेत्री आणि तिचा नवरा यांच्यात भांडण झाले होते. आता नव्या प्रोमोमध्ये सलमान खानसमोर त्याचे कुटुंबीय आले आणि त्यांच्या नात्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

बिग बॉस 17 च्या नवीन प्रोमोमध्ये क्रिती सेनन आणि शाहिद कपूर स्टेजवर सलमान खानसोबत सामील होताना दिसत आहेत. त्यानंतर स्पर्धकांचे काही कुटुंबीय स्टेजवर आले आणि सलमान खानशी बोलले. विशेषत: अंकिताची आई, मन्नाराची बहीण आणि विकीची वहिनी दिसतील. दोघींनीही त्यांच्या नात्याबद्दल चर्चा केली.

जेव्हा सलमानने आपल्या वहिनीला विचारले की तिला त्यांचा खेळ कसा वाटतो, तेव्हा ती म्हणते की, सध्या या दोघांमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत, ज्या टीव्हीवर पाहणे कुटुंबीय म्हणून आमच्यासाठी विचित्र आहे. दिवसेंदिवस यांत्यातील भांडणे वाढताना दिसत आहेत. त्यावर सलमान खान तिला म्हणतो की, विकीच्या आईने प्रेसमध्ये असे म्हटले आहे की, अंकिता आणि विकीच्या लग्नाविरोधात आहे. त्यानंतर अंकिताची आई असे म्हणताना दिसत आहे की, त्यांनी ते तसे का म्हटले आहे याचा आम्हालादेखील प्रश्न पडला आहे.

यानंतर, बिग बॉस घरातील सदस्यांना घोषणा करतात आणि सांगतात की परिसरातील थेट प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे, ईशा, विकी, अंकिता आणि आयशा यापैकी एकाला बाहेर काढले जाईल. ते त्याच क्षणी त्या सदस्याचे नाव उघड करतात आणि बहुतेक शक्यता असते की त्या वेळी आयशा किंवा ईशाला बाहेर काढले जाईल.

आता लाइव्ह ऑडिय़न्स च्या आधारे कोण घराबाहेर जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच प्रेक्षकांचे मन जिंकत कोण ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT