Ankita Lokhande-Vicky Jain Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande: कुटुंब कलह थांबेना! अंकिता विकीमधील वाद नव्या वळणावर

दैनिक गोमन्तक

Ankita Lokhande: बिग बॉसचा १७ वा सीझन संपण्यासाठी काही दिवस उरले आहे. ग्रॅड फिनाले जवळ येत असताना स्पर्धकांमधील जोशदेखील वाढताना दिसत आहे. त्यातच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यातील भांडणेदेखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तीने आएशाला विकीकडे धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. अंकिता आएशाला म्हणते की तुम्ही मस्ती करत आहात तर त्याची एक मर्यादा ठेवा. मर्यादा पार करु नका. त्यानंतर हा वाद वाढताना दिसत आहे. एके ठिकाणी विकी म्हणतो, या घरातील हे शेवटचे दिवस कधी संपणार काय माहित? आएशा आणि ईशाला अंकिता सांगताना दिसत आहे की, तो तसा नाही. आता शो संपण्यासाठी काही दिवस उरले असताना तो अशाप्रकारे बाहेर दिसावा असे मला वाटत नाही.

गेल्या काही दिवसांपासून विकी आणि अंकितामधील भांडणे वाढताना दिसत आहेत. कधी अंकिताच्या काही गोष्टी विकीला पटत नाही तर घरातल्या इतर लोकांबरोबर विकीने बोललेले अंकिताला आवडत नाही. यावरुनच त्यांच्यामध्ये भांडणे होताना पाहायला मिळतात.

याबरोबरच, दुसऱ्या एका प्रोमोमध्ये घरात एक टास्क होणार असल्याचे बिग बॉस सांगत आहे. हा गेम दोन टीममध्ये खेळला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हा गेम थेट नॉमिनेशनसंबंधी असणार आहे, जी टीम जास्त वेळ बझर दाबून ठेवण्यात यशस्वी होईल ती टीम नॉमिनेशनपासून वाचणार आहे.

दरम्यान, आता हा टास्क कोण जिंकणार कोणते स्पर्धक नॉमिनेशनमध्ये जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, शेवटच्या काही दिवसात कोणता स्पर्धक चाहत्यांचे मन जिंकण्यात यशस्वी होऊन ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणेदेखील प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT