Ankita Lokhande and Ranjna Jain Social Media
मनोरंजन

Ankita Lokhande: अंकिताच्या सासूबाईंना सलमानची खास ऑफर; म्हणाला- पुढच्या सीझनमध्ये तुम्ही...

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेची सासू रंजना जैन 'बिग बॉस 17' च्या ग्रँड फिनालेमध्ये तिच्या मोठ्या सुनेसोबत लाल बनारसी साडीत पोहोचली होती.

दैनिक गोमन्तक

Ankita Lokhande: बिग बॉसचा १७ चा सीझन नुकताच संपला आहे. रविवारी २८ जानेवारीला या रिऍलिटी शो चा ग्रँड फिनाले पार पडला आहे. मुनव्वर फारुकीने या सीझनचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. अभिषेक कुमार फर्स्ट रनअर अप, मन्नारा चोप्रा सेंकड रनरअप आणि अंकिता लोखंडे थर्ड रनर अप अशा स्थानावर होते.

आता सीझन संपला तरी काही स्पर्धकांच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आता तिच्या सासूमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंकिता लोखंडेची सासू रंजना जैन 'बिग बॉस 17' च्या ग्रँड फिनालेमध्ये तिच्या मोठ्या सुनेसोबत लाल बनारसी साडीत पोहोचली होती. यावेळी सलमानने तिला चिडवल्याचे पाहायला मिळाले.

फॅमिली वीक दरम्यान विकी जैनची आई शोमध्ये आली होती, त्यानंतर ती खूप चर्चेत होती. शोमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते आणि त्यामुळे सासूने नॅशनल टेलिव्हिजनवर सुनेचा क्लास घेतला होता. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरदेखील मोठी उलटसुटल चर्चा झालेली पाहायला मिळाली होती.

आता ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने अंकिता आणि तिच्या सासूबाई यांच्याबरोबर चांगलीच धमाल केली आहे. तो दोघींकडून वचनेदेखील घेताना दिसला आहे. यासोबतच सलमान खान अंकिताच्या सासूबाईंना म्हणाला, की तुम्हीच पुढच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून या, या लोकांनी तर या वर्षी काही केलं नाही. यावर त्या हसून प्रतिसाद देताना पाहायला मिळाल्या आहेत.

दरम्यान, या शोमध्ये अंकिता आणि विकी या दोघा नवरा बायकोमध्ये मोठी भांडणे झालेली पाहायला मिळालेली होती. त्यावरुन या दोघांचे नाते पुढे टिकणार की नाही अशा चर्चा रंगताना पाहायला मिळाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT