Ankita Lokhande  Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande: अखेर रियाच खरी... सुशांतबाबतची 'ती' गोष्ट सांगितल्याने अंकिता पडली तोंडावर

Ankita Lokhande: तेव्हा त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने त्याचा विमान उडवतानाचा एक व्हिडिओ शेअर करत रियाचा दवा फेटाळून लावला होता.

दैनिक गोमन्तक

Ankita Lokhande: टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'मध्ये दिसत आहे. तिचा पती विकी जैनही तिच्यासोबत आहे. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतचा शोमध्ये अनेकदा उल्लेख केला आहे. आता तिने दिवंगत अभिनेता सुशांतच्या अॅन्झायटी डिसऑर्डर क्लॉस्ट्रोफोबियाबद्दल असे विधान केले आहे, ज्यामुळे ती स्वतःच बोलून फसली आहे. सोशल मीडियावर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत आणि तिला ढोंगी असून नाटक करत असल्याचे म्हणत आहेत.

दिवगंत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम आहे. याबद्दल आजही उलटसुलट चर्चा होतानादेखील दिसतात. त्याच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. अनेकांनी आत्महत्या तर अनेकांनी हत्या असल्याचे म्हटले होते. त्याच्या मृत्यूसाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जबाबदार धरले होते व तिला अटकदेखील करण्यात आली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याला अॅन्झायटी डिसऑर्डर क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचे वक्तव्य रियाने केले होते. तेव्हा त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने त्याचा विमान उडवतानाचा एक व्हिडिओ शेअर करत रियाचा दवा फेटाळून लावला होता.

आता मात्र बिग बॉसच्या शो मध्ये अंकिताने स्वत:च सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अंकिताला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असून तिला खोटारडी म्हटले जात आहे. रियाने ही गोष्ट सांगितली होती तेव्हा अंकिताने नाकारले होते आता सत्य बाहेर आले आहे अशा आशयाच्या कंमेट नेटकरी करताना दिसत आहे. याबरोबरच, बिग बॉसच्या शो मध्ये स्वत: कडे लक्ष वेधून घेण्यासाठी देखील अंकिता सातत्याने सुशांतचे नाव घेत असल्याचे देखील नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान 2015 मध्ये सुशांतने स्वतः खुलासा केला होता की तो क्लॉस्ट्रोफोबियाशी झुंजत आहे. त्याने झी कॅफेला एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने सत्य आणि खोटे यांच्याशी संबंधित गेम खेळला. त्यांना स्वतःबद्दल तीन तथ्ये सांगायची होती, त्यापैकी एक खोटे होते. सुशांतने तीन गोष्टी सांगितल्या - 1. त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे, 2. तो दररोज 6 तास झोपतो, 3. तो खूप वाईट गायक आहे. नंतर त्यांनी दुसरे विधान खोटे असल्याचे उघड केले. त्याला निद्रानाश आहे आणि तो दररोज फक्त दोन तास झोपू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

SCROLL FOR NEXT