Ankita Lokhande-Vicky Jain Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: आईला पाहून अंकिता अन् विकी झाले इमोशनल

Bigg Boss 17: त्यांना टीव्हीवर पाहून अंकिता आणि विकीही भावूक होतात आणि विकी जोरजोरात रडूदेखील लागतो.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' च्या घरात अनेक रोमांचक गोष्टी घडत आहेत. रोज नवनवीन ट्विस्ट आणि स्पर्धकांमधील भांडणे पाहून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. आता शोचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे आणि वाइल्ड कार्ड स्पर्धक ओरी घरात दाखल झाला आहे.

सलमान खान आणखी एका मनोरंजक आणि रोमांचक वीकेंड का वार एपिसोडसाठी सज्ज आहे. या एपिसोडमध्ये सलमान खानने स्पर्धकांची अनेक गुपिते उघड केली. दरम्यान, शोमध्ये ओरी घरात प्रवेश करताना दिसला. सर्वप्रथम, सलमान खानने शोच्या मंचावर ओरीचे स्वागत केले. सलमान खानने ओरीच्या टी-शर्टवर 'आय एम अ लिव्हर' लिहिलेले दिसले. यानंतर अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाले.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची आई आजच्या वीकेंड का वारमध्ये दिसणार आहे. दोघेही कन्फेशन रूममध्ये बसून भावूक दिसत आहेत. त्यांना टीव्हीवर पाहून अंकिता आणि विकीही भावूक होतात आणि विकी जोरजोरात रडूदेखील लागतो.

विकीची आई विचारते की त्या दोघांना असे काय झाले की ते इतके भांडत आहेत. त्यांच्या भांडणामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण तयार झाल्याचे म्हणताना दिसत आहे. यावर अंकिता मी आहे, मी विकीला सांभाळून घेईन, तुम्ही रडू नका असे म्हटल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, सलमान खानजादीलाही तिच्या वागणूकीबद्दल फटकारताना दिसत आहे. ती इतर स्पर्धकांच्या लोकांच्या आरोग्याची चेष्टा करत असल्याचे सलमानने म्हटले आहे. यानंतर ती रडायला लागते आणि घरी जाण्यासाठी हट्ट करताना दिसत आहे.

मन्नारा आणि अंकिताचा वाद

मागील एपिसोडमध्ये, अंकिताने मन्नाराला सांगितले की इतर स्पर्धकांनी त्यांच्या नात्याचे कसे कौतुक केले कारण तिने त्यांच्याशी खरे नाते तयार केले होते. तिने मन्नाराला सांगितले की तिला या विषयावर चर्चा करायची असेल तर ती कधीही येऊन बोलू शकते.

ती मन्नाराला सांगते की कोणाचीही दिशाभूल करू नको आणि याविषयावर बोलायचे असेल ती एकांतात बोलू शकते. अंकिताचा आवाज वाढल्याने मन्नारा तिला शांतपणे बोलायला सांगते आणि मग दोघींमध्ये बाचाबाची होताना दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Films: मोफत असूनही प्रेक्षक नाहीत; मग 'कोकणी चित्रपट' तिकीट काढून कोण पाहणार?

Goa Politics: रमेश तवडकर व दिगंबर कामत मंत्रिपदी आरूढ; पण फेरबदलात लोकांच्या हिताचा विचार झाला का? प्रश्न अनुत्तरित

ओल्ड वाईन इन न्यू बॉटल! प्रमोद सावंतांच्या सरकारमध्ये दिगंबर कामतांची मेजॉरिटी; भाजप कार्यकर्त्यांना सरदेसाई म्हणाले, 'RIP'

Raigad Boat Capsizes: रायगड समुद्रात बोड बुडाली; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Goa Police Attack: पोलिसांवरील हल्ल्यामुळे काँग्रेसला चिंता, कारवाईची मागणी; मुरगाव पोलिस उपअधीक्षकांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT