Animal Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Animal Movie Advance Booking: रणबीर च्या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु; दर ऐकूण व्हाल चकित

Animal Movie Advance Booking: १ डिसेंबर रोजी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Animal Movie Advance Booking: रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर स्टारर आणि संदीप रेड्डी दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. प्रेक्षक 25 नोव्हेंबरपासून, 'बुक माय शो' मध्ये जाऊन त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहांची तिकिटे खरेदी करू शकतात.

'अॅनिमल'च्या टीझर आणि ट्रेलरने लोकांमध्ये एक वेगळीच खळबळ उडवून दिली आहे. १ डिसेंबर रोजी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.

हिंदी व्यतिरिक्त हा 3 तास 21 मिनिटांचा चित्रपट तामिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होत आहे. हा अॅक्शन, क्राइम आणि ड्रामा प्रकाराचा A म्हणजे अॅडल्ट प्रमाणित चित्रपट आहे. 18 वर्षाखालील लोक ते पाहण्यासाठी जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी तिकीट दरातही मोठी वाढ केली आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये या चित्रपटाच्या सामान्य तिकिटांचे दर 250 रुपयांपासून सुरू होतात. त्याच वेळी, या चित्रपटाची किंमत रिक्लिनर सीटसाठी 2200 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तथापि, रिक्लिनर्सच्या किमती साधारणपणे 900 ते 1800 रुपयांपर्यंत असतात.

तसेच, मल्टिप्लेक्समध्ये त्याची किंमत सामान्यपेक्षा दरापेक्षा जास्त आहे, जी 650 रुपयांपर्यंत आहे. मुंबई( Mumbai )तही दर सारखेच आहेत. एकूणच, 100 कोटींची कमाई करणारा हा चित्रपट( Movie ) आताच रेकॉर्डब्रेक कलेक्शन करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलर आणि टिझरने ज्याप्रकारे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ती उत्सुकता आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT