बंगाली चित्रपट 'रवींद्र काब्य रहस्य' इफ्फीच्या 'ICFT- युनेस्को गांधी' पदकाच्या शर्यतीत

'रवींद्र काब्य रहस्य' प्रतिष्ठित आयसीएफटी - युनेस्को गांधी पदकासाठी इतर दहा उल्लेखनीय चित्रपटांसह स्पर्धा करत आहे.
 ICFT – UNESCO Gandhi Medal in 54th IFFI
ICFT – UNESCO Gandhi Medal in 54th IFFI

ICFT – UNESCO Gandhi Medal in 54th IFFI : सायंतन घोषाल दिग्दर्शित 'रबिन्द्र काब्य रहस्य' हा बंगाली चित्रपट आज 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागांतर्गत प्रदर्शित झाला. हा चित्रपट इफ्फीमध्ये प्रतिष्ठित आयसीएफटी - युनेस्को गांधी पदकासाठी इतर दहा उल्लेखनीय चित्रपटांसह स्पर्धा करत आहे.

इफ्फीमधील पॅनोरमा अंतर्गत गांधी पदकासाठी चित्रपटाला नामांकन मिळाल्याबद्दल दिग्दर्शकाने घोषाल यांनी आनंद व्यक्त केला. चित्रपट रहस्यमय घटकांचा समावेश असलेली एक साहसी कथा आहे, असे घोषाल यांनी सांगितले.

चित्रपटाचा नायक प्रियांशू चॅटर्जी टागोरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो, समकालीन युगातील एका हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करतो आणि दोन वेगवेगळ्या कालखंडात गुंफलेल्या कथेचा उलगडा करतो. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतील गूढतेला मानवंदना आहे, हा मानवी भावना आणि अस्मितेच्या गुंतागुंतीचा शोध घेतो” असे चित्रपटाविषयी बोलताना निर्माते हिमांशू धनुका म्हणाले.

चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या चिरंतन श्लोकांप्रमाणेच हृदयावर आणि मनावर अमिट छाप सोडेल, असे धनुका यांनी सांगितले. चित्रपट पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

काय आहे चित्रपटाचा सारांश ?

'रबिन्द्र काब्य रहस्य' रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यिक वारशाच्या काव्यात्मक टेपेस्ट्रीच्या कथा उलगडतो. चित्रपट 100 वर्षांपूर्वीचा आणि एक सध्याच्या काळातील अशा दोन टाइमलाइन्समध्ये चित्रित गूढ हत्येची कथा आहे. शंभर वर्षांपूर्वी कवी एकलव्य सेन समवयस्कांच्या फसवणुकीला बळी पडले, त्यांची काव्यरचनांची चोरी झाली होती. प्रतिशोधासाठी, एकलव्याने त्यांच्या मृत्यूची योजना आखली.

कवी आणि जाणकार अभिक बोस हे रवींद्र संगीत गायिका हिया सेन सोबत एकत्र येतात आणि शंभर वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडून दाखवतात. ही कथा बंगालच्या नयनरम्य परिसरात साकारली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com