HBD Anil Kapoor | Anil Kapoor Birthday |Anil Kapoor best 10 bollywood movies Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Anil Kapoor: वय वाढलं तरीही फिटनेस झकास; अनिल कपूर यांचे 'हे' 10 हिट चित्रपट पाहिलेत का?

Anil Kapoor: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

दैनिक गोमन्तक

Anil Kapoor Birthday: बॉलुवूडमधील प्रसिध्द अभिनेता अनिल कपूर यांचा आज आज वाढदिवस आहे. त्यांनी अभिनयासह फिटनेटमुळे चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे.ते एक उत्तम अभिनेते असण्यासोबत निर्माते देखील आहेत. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या वाढदिवशी जाणून घ्या त्यांचे टॉप 10 चित्रपट कोणते आहेत.

  • मि. इंडिया

'मि. इंडिया' हा बॉलिवूडचा (Bollywood) एक उत्तम चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, श्रीदेवी, अमरीश पुरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

  • नायक: द रिअल हीरो

एस. शंकर दिग्दर्शन 'नायक: द रिअल हीरो' हा चित्रपट अनिल कपूर, रानी मुखर्जी अमरीश पुरी, परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

  • राम लखन

राम लखन हा चित्रपट 1991 साली रिलीज झाला होता. सुभाष घई यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, राखी व अमरीश पुरी मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला होता.

  • मेरी जंग

मध्यमवर्गीय कुटुंबावर भाष्य करणारा 'मेरी जंग' हा चित्रपट 1985 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये अनिल कपूरने आठ वर्षीय अरुण शर्माची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घईंनी केलं होतं.

  • तेजाब

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितचा 'तेजाब' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 1988 साली हा चि प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटामुळे माधुरी आणि अनिल कपूरची जोडी हीट झाली.

  • मशाल

'मशाल' हा सिनेमा 1984 साली रिलीज झाला होता. यश चोप्राने या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. या चित्रपटात दिलीप कुमार, वहिदा रेहमान व अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले या मराठी नाटकावर आधारित हा चित्रपट होता.

  • लम्हे

'लम्हे' 1991 साली रिलीज झाला होता. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवू शकला नाही.

  • विरासत

'विरासत' मध्ये अनिल कपूर, तब्बू, अमरीश पुरी, मिलिंद गुणाजी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 43 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला 16 नामांकन मिळाली होती.

  • परिंदा

परिंदा या चित्रपटाला माधुरी दीक्षित, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. विनोद चोप्राने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

  • वो 7 दिन

'वो 7 दिन' या चित्रपटामध्ये अनिल कपूर प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट 1981 साली आलेल्या 'अंधा 7 नाटकाल' या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT