Ananya Panday Reveals A Secret Of Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood अनन्या पांडेने उलगडले दीपिका पदुकोणचे रहस्य!

शकुन बत्राचा गहराइयां हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे पण चित्रपट दिवसेंदिवस यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. जेव्हा अनन्याला विचारले की चित्रपटाच्या सेटवर कोण जास्त खाते, तेव्हा तिने सांगितले की दीपिका एक मोठी फूडी आहे.

दैनिक गोमन्तक

दीपिका पदुकोणही ही अतिशय सुंदर तर आहेच पण तेवढिच फिट सुध्दा आहे. त्यांना पाहून असे वाटते की तिने खूप कमी खाल्ले असेल आणि तेही विचारपूर्वक पण अनन्या पांडेने दीपिका पदुकोण खाण्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे, जो ऐकून खूप आश्चर्य वाटेल. तिने सांगितले की, दीपिका (Deepika Padukone) एक फूडी आहे आणि तिला जेवणाची खूप आवड आहे. 14 फेब्रुवारीला OTT वर प्रदर्शित झालेला गहराइयां हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. यात भुमिका साकारलेल्या दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांच्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (Ananya Panday Reveals A Secret Of Deepika Padukone)

दीपिका करायची सेटवर सगळ्यांसाठी जेवणाची ऑर्डर

शकुन बत्राचा गहराइयां हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ तर घालत आहेच पण चित्रपट दिवसेंदिवस यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. चित्रपटात टियाची भूमिका साकारणाऱ्या अनन्या पांडेने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाशी संबंधित स्टारकास्टबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये दीपिकाशी संबंधित माहिती समोर आली, ती खूपच आश्चर्यकारक आहे.

जेव्हा अनन्याला (Ananya Panday) विचारण्यात आले की चित्रपटाच्या सेटवर कोण जास्त खातात, तेव्हा तिने सांगितले की दीपिका एक मोठी फूडी आहे. ती आम्हा सर्वांसाठी जेवणाची ऑर्डर देत असे. तसेच, अनन्याला सेटवर सर्वात जास्त इंट्रेस्टिंग कोण आहे असे विचारण्यात आले, तेव्हा तिने स्वतःला सर्वात मनोरंजक असे शीर्षक दिले. अनन्या आणि दीपिका यांच्यात एक विशेष बंध निर्माण झाला आहे, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दोन्ही सुंदरी एकमेकांशी मस्ती करतांना आणि आरामात विनोद करताना दिसल्या आहेत.

दीपिकाचे मन अनन्याच्या बॉयफ्रेंडवर

गहराइयां (Gehraiyaan) या चित्रपटात अलीशा म्हणजेच दीपिका टियाची (अनन्या पांडे) चुलत बहीण बनली आहे. दोघांच्याही मंगेतर वेगवेगळ्या आहेत पण नंतर अलीशाला टियाची मंगेतर जेन म्हणजेच सिद्धांत चतुर्वेदी आवडू लागली. त्याच वेळी, हळूहळू चित्रपटाच्या शेवटपर्यंत अनेक खुलासे होतात आणि चित्रपटात अनेक वळणे येतात. चित्रपटात दीपिका-सिद्धांतचे चुंबन आणि रोमँटिक दृश्ये आहेत.

दीपिका आणि अनन्याचे चित्रपट

अनन्या पांडे लवकरच साऊथचा स्टार अभिनेता विजय देवरकोंडा सोबत ‘लाइगर' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'खो गये हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव सोबत दिसणार आहे. त्याचबरोबर दीपिकाच्या बकेट लिस्टमध्ये फायटर आणि पठाण सारखे मोठे चित्रपट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

Goa Politics: खरी कुजबुज; काल किती खून झाले?

Goa Latest Updates: अजय गुप्ताच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

Goa Airline Incentive Scheme: गोव्यात विमान कंपन्यांना मिळणार 'बुस्टर डोस'! नवीन मार्गांसाठी तगडं अनुदान; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 'एअरलाईन इन्सेन्टिव्ह' योजना

Donald Trump: युद्धाच्या सावटात ट्रम्प यांचं 'थँक्यू' मिशन! 800 कैद्यांची फाशी रोखल्यानं अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल; इराणवरील हल्ल्याच्या चर्चेला फाटा

SCROLL FOR NEXT