Ananya Panday & Ishaan Khatter break up  Dainik Gomantak
मनोरंजन

3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अनन्या पांडे-ईशान खट्टरचा ब्रेकअप

अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांनी 3 वर्षे एकत्र राहिल्यानंतर नात्यातुन ब्रेक घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या काही वर्षांपासून, अनन्या पांडे (Ananya Panday) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) एकमेकांवरील त्यांच्या प्रेमाबद्दल जोरदार चर्चेत आहेत. वेळोवेळी, त्यांनी पुष्टी केली की, त्यांचे "रिलेशनशिप स्टेटस" अनेक पार्टीज मध्ये तसेच हॉलिडे डेस्टिनेशन्सवर देखील एकत्र पाहिले गेले आहे. (Ananya Pandey and Ishaan Khattar have taken a break from their relationship after being together for 3 years)

अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांनी 3 वर्षे एकत्र राहिल्यानंतर नात्यातुन ब्रेक घेतला आहे. “खाली पिलीच्या सेटवर दोघांचे चांगले नाते जुळल्याचे दिसून आले होते आणि तिथूनच एका नवीन प्रवासाला सुरुवात देखील झाली होती. मात्र, 3 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी अखेर त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. हा एक म्युच्युअल कॉल होता आणि गोष्टी सकारात्मक नोटवर संपल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. दोघे पुढेही सौहार्दपूर्ण राहतील,” असे या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने सांगितले आहे.

जर ऑफर आली आणि मॅच्युरिटीने ब्रेकअप हाताळले तर दोघे एकत्र चित्रपटही काम करू शकतात असेही सांगण्यात आले आहे. “मैत्रीच्या आघाडीवर त्यांच्यासाठी सर्व काही ठीक आहे, आणि ते चांगल्या नोटवर वेगळे झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या लक्षात आले की गोष्टींकडे पाहण्याची त्यांची पद्धत एकमेकांपेक्षा थोडी वेगळी आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.”

विशेष म्हणजे, फक्त एका महिन्यापूर्वी, शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ईशान आणि अनन्या एकत्र दिसून आले होते. विभक्त होण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आणि ही अशी बातमी आहे जी उद्योगाला नक्कीच आश्चर्यचकित करणारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT