KGF2 Twitter
मनोरंजन

KGF Chapter 2|अमूल टॉपिकनने साजरा करतोय बॉक्स ऑफिसवरील 'यश'

KGF Chapter 2 या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे

दैनिक गोमन्तक

KGF Chapter 2 या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या स्टोरीपासून ते दमदार अॅक्शन सीक्वेन्स आणि रॉकी भाईचे दमदार डायलॉग चाहत्यांना खूप आवडत आहे. तसेच हा चित्रपट रिलीज झाल्यापासून कमाईचे नवीन विक्रम करत आहे. एकीकडे KGF 2 हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे या चित्रपटाने आता IMDb (Internet Movie Database) वरही इतिहास रचला आहे. या चित्रपटाला IMDb वर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे.

देशातील प्रसिद्ध अमूल ब्रॅंडने KGF Chapter 2च्या चित्रपटाचे यश पाहून कौतुक केले आहे. अमूलने आपल्या अधिकृत ट्वीटर (Twitter) अकाऊंटवर फोटो शेअर करत केजीएफचे कौतुक केले आहे. "कुलार मे गोल्ड रखो" असे अमूलने त्या फोटोमध्ये लिहिले आहे.

या चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांना दुसरा भाग पाहण्याची खूप उत्सुकता होती. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अभिनेत्री रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहेत. 'KGF 2' हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपली जादू पसरवायाला सुरुवात केली होती. दीडशे कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने व्यवसायाच्या वेगाने सर्वच चित्रपटांना मागे टाकायला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT