Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood: अमिताभ बच्चन यांची खास कविता 'चेहरे'

(Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन यांनी 'चेहरे' चित्रपटाचे केले खास पद्धतीने प्रमोशन

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचे (Bollywood) जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या त्यांच्या 'चेहरे' या चित्रपटामुळे (Movie) चांगलेच चर्चेत आहेत. हा चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून. अमिताभ बच्चन सस्पेन्सफुल 'चेहरे' (Chehare) या चित्रपटामध्ये वकिलाची भूमिका साकारत आहेत. ज्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमही मिळत आहे. या सगळ्या दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी आणि 'चेहरे' च्या प्रेक्षकांसाठी एक खास कविता लिहिली आहे.

अमिताभ बच्चन हे बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहेत जे आपल्या चाहत्यांसोबत कायम टचमध्ये असतात. त्यांनी आता 'चेहरे' चित्रपटाचे खास पद्धतीने प्रमोशन केले आहे. या चित्रपटाच्या रिलीजवर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास कविता लिहिली आहे.

अमिताभ बच्चन यांची कविता-

चेहरे समझते हैं, चेहरे ने ये कैसे काम किया है

चेहरे समझते हैं, चेहरे ने ये कैसे काम किया है,

चेहरे ने खुद अपनी सजा का इंतजाम किया है,

चेहरे करते सब नफे के लिए, चेहरे जानते हैं ये,

चेहरे ने खुद यहां अपना क्यों नुकसान किया है,

बेशकीमती थे चेहरे, कीमत चेहरे न लगा पाए कभी,

चेहरे ने खुद अपना यहां कम क्यों दाम किया है,

शोहरतों ने चेहरे को मशहूर कर दिया था यहां पर

चेहरे ने खुद सबके सामने खुद को अंजान किया है,

चेहरे की अदालतों में, चेहरे खड़े हैं कठघड़े में देखो,

चेहरे ने खुद चेहरे को, दलीलों को फरमान किया है,

चेहरे सोचते हैं आखिर चेहरे ने कैसे ये काम किया है

चेहरे ने खुद अपनी सजा का इंतजाम किया है,

चेहरे करते सब नफे के लिए, चेहरे जानते हैं ये

चेहरे ने खुद यहां अपना क्यों नुकसान किया है,

अमिताभ बच्चन व्यतिरिक्त, इम्रान हाश्मी, क्रिस्टल डिसूझा, अनु कपूर आणि रिया चक्रवर्ती 'चेहरे' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे, 'चेहरे' चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी करत आहेत तर निर्माता आनंद पंडित आहेत. हे सर्वजण आजकाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर आमनेसामने दिसणार आहेत. 'चेहरे' चित्रपट 27 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

विशेष म्हणजे, 'चेहरे' आधी एप्रिलमध्ये रिलीज होणार होता, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटगृहे बंद करण्यात आली आणि चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. निर्माते आनंद पंडित यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी चित्रपटगृहात नेण्याचा निर्णय घेतला, जरी वाट पाहावी लागली तरी. चेहरे हा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे ज्याची दुसरी लाट शमल्यानंतर नाट्य प्रदर्शनासाठी जाहीर करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT