Ameesha Patel Dainik Gomantak
मनोरंजन

'दुश्मन न करे दोस्त ने वो...' अमिषाच्या 'गदर 2' वर घरच्या लोकांनीच टाकला बहिष्कार...

Rahul sadolikar

Amisha Patel's friends and family boycotted gadar 2 rrk93 : अमिषा पटेल सध्या तिच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 

सनी देओलसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. सगळीकडे अमिशाचं कौतुक होत असताना आता अमिशाच्या कुटूंबियांनी मात्र तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला आहे. अलीकडेच अमिषाने स्वत:च ही गोष्ट सांगितली.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

गदर 2 हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा गाठण्याच्या जवळ असताना, तो जगभरातील 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाला भरभरून दाद देत आहेत. 

आता या अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील काळे सत्य समोर आणले आहे आणि इंडस्ट्रीतील लोक एकमेकांना मोठं झालेलं पाहू इच्छित नाहीत. 

अमिषाचे कुटूंबिय आणि मित्र

अलीकडेच अमिषा पटेलने एका मुलाखतीत खुलासा केला की तिच्या मित्र आणि कुटुंबासह अनेकांना शंका होती. अभिनेत्रीने स्वतः सांगितले की तिच्या जवळच्या मित्रांना तिने विचारले की ते 'गदर 2' पाहण्यासाठी थिएटरमध्ये जातील की नाही यावर तिला नकारात्मक उत्तर मिळालं 'गदर'च्या वेळीही लोकांनी तिच्या बाबतीत असंच केलं होतं, त्या लोकांना फक्त माझा अपमान करायचा आहे असंही अमिषा म्हणाली. 

लोकांच्या प्रतिक्रिया

अमीषाने पुढे सांगितले की, लोकांनी तिला सांगितले होते की, OTT च्या जमान्यात लोकांना पैसे देऊन चित्रपट बघायला आवडेल की नाही. 

अमीषा म्हणाली की काही लोकांनी तिला असेही सांगितले की 'गदर 2' ला काही प्रेक्षक मिळू शकतात कारण लोकांना तारा आणि सकीनाच्या आयुष्यात काय घडले हे जाणून घ्यायचे आहे. मात्र, गदरप्रमाणेच गदर 2 ची अपेक्षा करू नये, अशाही प्रतिक्रिया आल्याचं अमिषाने सांगितलं. 

चित्रपटाचं यश

निर्माता-दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा 'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील सकीनाच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतक्या वर्षांनंतरही तारा आणि सकिना या जोडीने आपल्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. 

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT