kareena kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Amisha Patel On Kareena Kapoor: 'कहो ना प्यार है' चित्रपट करिनाने का सोडला? अमिषा पटेलचा खुलासा

Amisha Patel On Kareena Kapoor: चित्रपटाने वेगवेगळ्या श्रेणीत 92 अवॉर्ड जिंकले आहेत.

दैनिक गोमन्तक

Amisha Patel On Kareena Kapoor: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली आहे. गदर प्रमाणेच गदर 2 ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

गदर 2 च्या निमित्ताने चित्रपटातील कलाकार नव्याने चर्चेत आले आहेत. त्यांच्या जून्या चित्रपटांविषयी पून्हा चर्चा होताना दिसत आहे.

आता अमिषा पटेलने करिनाविषय़ी मोठा खुलासा केला आहे. 'कहो ना प्यार है' हा चित्रपट करिनाने अर्ध्यातच का सोडला याचे कारण अमिषा पटेलने सांगितले आहे. राकेश रोशन आणि करिना यांच्यात मतभेद झाल्याने तिने हा चित्रपट मधूनच सोडल्याचे अमिषाने म्हटले आहे.

अमिषा पटेलला कसा मिळाला हा चित्रपट?

एका लग्नात राकेश रोशन यांनी अमिषा पटेलला पाहिले होते. जेव्हा करिनाने चित्रपट सोडला तेव्हा सोनियाच्या भूमिकेसाठी त्यांना योग्य चेहरा लवकरात लवकर हवा होता. त्यावेळी त्यांनी अमिषा पटेलला चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी विचारले होते.

महत्वाचे म्हणजे अमिषा पटेल आणि ऋतिक रोशन दोघांनीदेखील या चित्रपटातून डेब्यू केले आहे. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते.

2000 साली 'कहो ना प्यार है' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सगळ्यात जास्त अवॉर्ड जिंकण्यासाठी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि गिनिज बुक मध्ये चित्रपटाची नोंद झाली आहे. चित्रपटाने वेगवेगळ्या श्रेणीत 92 अवॉर्ड जिंकले आहेत.

दरम्यान, सध्या गदर ची संपूर्ण टीम चित्रपटाचे यश साजरे करत आहेत. त्यांच्या या यशात बॉलीवूडचे कलाकार विविध माध्यमातून सहभागी होत असल्याचे दिसत आहेत. आता आणखी गदर 2 किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीला काळिमा! गाईच्या पोटातून निघाला 48 किलो प्लास्टिकचा डोंगर; वाळपईत 'रेकॉर्ड ब्रेक' शस्त्रक्रिया

Viral Video: 'मी नाही तर कोणीच नाही!' बॅटिंग मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं अख्खं क्रिकेट ग्राऊंडच नांगरलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

VIDEO: ''...तर मग भारताचं ऑपरेशन सिंदूर कसं चुकीचं?" मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कराला दिला घरचा आहेर

Viral Video: रेल्वे प्रवासात 'फ्री स्टाईल' हाणामारी! प्रवाशांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं; जीव वाचवण्यासाठी मुलींची पळापळ

Temba Bavuma: 'मैदानावर जे घडलं ते मी विसरत नाही...' बुमराह-पंतने मागितली माफी; टेंबा बावुमाचा टीम इंडियाबाबत मोठा खुलासा VIDEO

SCROLL FOR NEXT