Amir Khan- Junaid khan Dainik Gomantak
मनोरंजन

Amir Khan: आमिरचा मुलगा जुनैदचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

Amir Khan: हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Amir Khan's son junaid khan debut movie maharaj first look teaser

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अमिर खानचा मुलगा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जुनैद गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अॅक्टिंग डेब्यूमुळे मोठ्या चर्चेत आहे. महाराज या चित्रपटातून तो मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला, जो खूपच आकर्षक आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

निर्मात्यांनी एकाच व्हिडिओमध्ये तिन्ही चित्रपटांचा फर्स्ट लुक रिलीज केला. महाराजांच्या फर्स्ट लूक टीझरमध्ये आलिशान राजवाडा दाखवण्यात आला आहे. मात्र जुनैद खानचा लूक समोर आलेला नाही मात्र पाठमोरा दिसत आहे.

या चित्रपटात जुनैद पत्रकाराची भूमिका साकारत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या जुनैद खानची भूमिका आणि लूक पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. जुनैद बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची तयारी करत होता आणि खूप उत्सुक आहे. काही आठवड्यांपूर्वी तो वडील आमिर खान आणि अभिनेत्री सई पल्लवीसोबत जपानमध्ये शूटिंग करताना दिसला होता.

'महाराज' व्यतिरिक्त जुनैद खान निर्माता म्हणूनही पदार्पण करत आहे. तो 'प्रीतम प्यारे' या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. पापा आमिर खान या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहेत. महाराज हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT