Amir Khan New Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Amir Khan : आमिर नव्या भूमीकेत... मि.परफेक्शनिस्ट साकारणार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची भूमीका

अभिनेता आमिर खान लाल सिंह चढ्ढानंतर आता या नव्या चित्रपटात दिसणार आहे...

Rahul sadolikar

Amir Khan will Play role of ad.ujjwal Nikam : लाल सिंह चढ्ढाच्या अपयशानंतर अभिनेता आमिर खानने इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या दरम्यान बॉयकॉटचा ट्रेंड चालू होता. या ट्रेंडचा मोठा फटका आमिरच्या चित्रपटाला बसला होता.

हॉलीवूडचा चित्रपट फॉरेस्ट गम्पचा रिमेक असलेल्या या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूरही दिसली होती. चांगली कथा आणि अभिनय असूनही चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता आमिर एका नव्या भूमीकेत नव्या चित्रपटासह परतण्यासाठी सज्ज आहे.

आमिर दिसणार या भूमीकेत

आमिर आता एका पूर्णत: वेगळ्या भूमीकेत दिसणार आहे. अमर उजालाच्या वृत्तानुसार आमिर खान ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ही बातमी ऐकून साहजिकच चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

मि. परफेक्शनिस्ट

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान प्रत्येक चित्रपटात आपल्या प्रेक्षकांसाठी काही वेगळा आशय घेऊन येतो. आमिरने बहुतेक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये समाजाबद्दल नक्कीच काहीतरी छुपा संदेश असतो. 

मात्र, अभिनेत्याचा मागील चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिरने चित्रपटातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. आता बातम्या येत आहेत की आमिर चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

उज्ज्वल निकम यांचा बायोपिक

अमर उजालाच्या वृत्तानुसार, आमिर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. 

अविनाश अरुण या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अविनाशने 'पाताल लोक', 'स्कूल ऑफ लाईज' आणि 'किल्ला' सारखे चित्रपट केले आहेत.

सध्या फक्त चर्चा सुरू

अलीकडेच एका मुलाखतीत आमिर म्हणाला, 'ही गोष्ट कशी समोर आली हे मला माहीत नाही कारण प्रत्यक्षात हा चित्रपट अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

 याबद्दल बोलणे खूप घाईचे आहे. माझ्याकडे काही कल्पना आहेत, परंतु अद्याप त्याबद्दल काहीही ठोस नाही. अद्याप काहीही काम सुरु झालेलं नाही. सध्या फक्त चर्चा सुरू आहे.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT