Ameesha Patel  Dainik Gomantak
मनोरंजन

Ameesha Patel : राकेश रोशन यांनी मला ओळखलेच नाही! अमिशा पटेलने सांगितला तो किस्सा...

अभिनेत्री अमिशा पटेलने एका शोमध्ये कहो ना प्यार है चित्रपटादरम्यानचा राकेश रोशन यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे.

Rahul sadolikar

सध्या अभिनेत्री अमिशा पटेलची सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे. 'गदर 2: द कथा कंटिन्यूज' या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने 2000 मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते .

 कहो ना प्यार है चे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते. एका लग्नात राकेश रोशन यांच्या नजरेस पडल्यानंतर दोन दिवसांतच अमीषाने तिला या चित्रपटासाठी कसे साईन केले होते हे उघड केले आहे, परंतु दुसऱ्या भेटीत राकेश रोशन यांनी तिला ओळखलेच नाही.

हृतीकचा पहिला चित्रपट

अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी कहो ना प्यार है दिग्दर्शित करून हृतिकला चित्रपटामध्ये लाँच केले होते. 23 वर्षांपूर्वी 67 कोटी रुपयांच्या एकूण जगभरातील कलेक्शनसह हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला . कपिल शर्मा शोमध्ये तिच्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान, अमीषाला एका अफवेबद्दल विचारण्यात आले होते की ती फक्त 14-15 वर्षांची होती जेव्हा तिला राकेश रोशनने पाहिले होते जे तिला एका चित्रपटात कास्ट करण्यास उत्सुक होते. 

तेव्हा मी 14-15 वर्षांची होते

ती म्हणाली, “ते खरे आहे पण जेव्हा तिने हे सांगितले तेव्हा मी फक्त 14-15 वर्षांची होते. मला हृतिकसोबत कास्ट करायचे होते, असे ते म्हणाले. माझे कुटुंब तयार नव्हते त्यामुळेच राकेश रोशन यांना तिने नकार दिला आणि म्हणाली आम्ही राजकीय-व्यावसायिक पार्श्वभूमीचे आहोत आणि मी अभ्यासासाठी बोस्टनला जात आहे.”

अमिशाला राकेश रोशन यांनी ओळखलंच नाही

E Times दिलेल्या मुलाखतीत अमिशा म्हणाली "पण नंतर जेव्हा मी बोस्टनहून परतले, तेव्हा मी एका लग्नासाठी गेले होते आणि मी निघालेच होते इतक्यात तिथं राकेश काका आले. सुरुवातीला ते मला ओळखू शकले नाहीत तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी सांगितले, 'ही अमिषा आहे, ती नुकतीच परत आली. बोस्टनहून. त्यांना आश्चर्यच वाटले आणि त्यानंतर दोन दिवसांत मी कहो ना प्यार हैचा करार केला होता आणि एका आठवड्याच्या कालावधीत मी शूटिंग करत होते,"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

Goa Live News: भाजप उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला; मंत्री बाबूश मॉन्सेरात यांची खास उपस्थिती

SCROLL FOR NEXT