Sunny Deol & Amisha Patel Dainik Gomantak
मनोरंजन

Ameesha Patel: गदरची सकीना म्हणाली त्या रिलेशनने माझे करिअर उद्धवस्त केले

Ameesha Patel: हेच कारण आहे ज्यामुळे मी गेल्या 12-13 वर्षापासून सिंगल आहे.

दैनिक गोमन्तक

Amisha Patel: सनी देओलचा 'गदर 2' लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'गदर' च्या ऐतिहासिक यशानंतर आता चाहते गदर 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'गदर 2' च्या निमित्ताने चित्रपटातील सिताऱ्यांचीदेखील मोठी चर्चा होताना दिसत आहे.

सनी देओलसोबत प्रमुख भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अमिषा पटेल देखील काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने केलेल्या आपल्या वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य केले आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आपल्या करिअरवर कसा परिणाम झाला याबद्दल ती बोलताना दिसून आली आहे.

अमिषा म्हणते की, 'या इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रामाणिक असणे गरजेचे नाही. मी जास्त इमानदार होते. मी प्रॅक्टिकल नव्हते. माझे जे दोन रिलेशनशिप झाले ते त्याचा खूप वाईटप्रकारे माझ्या करिअरवर परिणाम झाला. हेच कारण आहे ज्यामुळे मी गेल्या 12-13 वर्षापासून सिंगल आहे.

माझ्या आयुष्यात फक्त आता शांतता आहे आणि आता मला माझ्या आयुष्यात काहीच नको आहे.' पुढे अमिषा पटेल ने असेदेखील म्हटले आहे की, जर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सिंगल असल्याचा स्टेटस मेंटेंन करता तर ते तुमच्या करिअरसाठी अधिक फायदेशीर ठरते.

मिळालेल्या माहीतीनुसार, अमिषा पटेलच्या एका रिलेशनशिपमुळे तिचे करिअर सुरळीत चालू शकले नाही. चित्रपटनिर्माते विक्रम भट्ट यांच्याबरोबरचे तिचे रिलेशन भलतेच चर्चेत होते. 5 वर्षे ते सिरियस रिलेशनमध्ये होते. 2008 च्या दरम्यान त्यांच्या नात्यात दुरावा आला. या रिलेशनचा अमिषा पटेलच्या करिअरवर परिणाम झाल्याचे म्हटले जाते.

दरम्यान , काही दिवसांपूर्वी अमिषा पटेलला फसवणूकीप्रकरणी कोर्टाने समन्स बजावले होते. याबरोबरच 'गदर 2' मधील 'उड जा काले कावा' हे गाणे रिलिज झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उत्सफुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले होते.

गदर चित्रपटातील हे लोकप्रिय गाणे 'गदर 2' मध्ये रिक्रिएट करण्यात आले आहे. गाण्यातील तारा आणि सकीनाने पून्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यश मिळाले आहे. गदर 2 लवकरच चित्रपटगृहाच दाखल होणार असून आता चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT