Rakhi Sawant: राखी सावंतने असं काय केलं की लोक म्हणाले यासाठी राखीला तुरुंगात..

Rakhi Sawant: हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आपला संताप व्यक्त करत आहेत.
Rakhi Sawant:
Rakhi Sawant:Dainik Gomantak
Published on
Updated on

Rakhi Sawant: राखी आणि ड्रामा हे समीकरण प्रेक्षकांसाठी नवीन नाही. राखी कुठेही, कधीही काहीही करताना दिसत असते. बऱ्याच वेळा ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते तर अनेकदा तिच्या कृत्यांवर प्रेक्षक नाराज होताना दिसतात.

अनेकदा राखी सावंतला मोठ्या टीकेलादेखील सामोरे जावे लागते. आता अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे सोशलमिडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.

सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ एअरपोर्टवरचा असून यावेळचे अनेक फोटोदेखील शेअर करण्यात आले आहेत. राखी हातात नोट घेऊन ते पायलटवर उधळले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आपला संताप व्यक्त करत आहेत.

एका युजरने म्हटले आहे की, या घाणेरड्या वागणूकीसाठी राखी सावंतला जेलमध्ये टाकले पाहिजे. दुसरा युजर म्हणतो- ही आत्ता पैशांचा पाऊस पाडत आहे , आईच्या दवाखान्यासाठी , उपचारांसाठी अंबानीकडे रडून रडून पैसे मागत होती.

एका युजरने म्हटले आहे की, हे तर वीस रुपयांच्या नोटा आहेत. पायलटची कमाई किती आणि राखीची नाटकं किती आहेत बघा. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, राखीचा ड्रामा कधीच चांगला नसतो पण हा तिचा सगळ्यात वाईट व्हिडिओ आहे.

तर काहींनी म्हटले आहे की राखीला पैशांची किंमत नाही. पैशांची इज्जत करायला शिक राखी. अशाप्रकारे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडून राखीवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.

Rakhi Sawant:
Rekha: 'या' खास व्यक्तीसाठी लावते सिंदूर... अखेर रेखाने उलगडले रहस्य

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदिलसोबत घटस्पोट फायनल झाल्यानंतर राखी आनंद व्यक्त करताना दिसली होती. नववधूसारखे तयार होऊन आनंद व्यक्त करतानाचा तिचा व्हिडिओ समोर आला होता. आता नेटकरी म्हणत आहेत की, आदिलसोबत लग्न, घटस्पोट हे सगळे संपल्यानंतर राखीजवळ ड्रामा करण्यासाठी काहीच उरले नाही त्यामुळे ती असे प्रकार आता नव्याने शोधत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com