Alia Bhatt Mangalsutra Instagram/@aliabhatt
मनोरंजन

Alia Bhatt Mangalsutra: आलियाच्या मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये लपलाय रणबीरचा लकी नंबर

आलियाच्या या हटके मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा लग्नसोहळा पाली हिल्स येथील 'वास्तू' या घरामध्ये पार पडला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर आलियाने इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील आलिया आणि रणबीरच्या सुंदर लूकने अनेकांचे लक्ष वेधलं आहे. सध्या आलियाच्या मंगळसूत्राची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. आलियाच्या मंगळसूत्राची डिझाइन खूप खास आहे. चला तर मग जाणून घेऊया आलियाचे मंगळसूत्र का खास आहे.

आलियाचं (Alia Bhatt) मंगळसूत्र हे सोन्याच्या चैन पासून तयार केलेले आहे. तसेच टीयर ड्रॉप शेपमधील डायमंड आणि काळे मोती देखील मंगळसूत्रामध्ये आहेत. मंगळसूत्राचे पेंडंट इनफिनिटी डिझाइने तयार करण्यात आले असून त्याचा आकार आठ नंबरसारखा आहे. आठ नंबर हा रणबीरचा (Ranbir Kapoor) लकी नंबर आहे. त्यामुळे आलियाचं मंगळसूत्र खास असण्याचे हे एक कारण आहे. आलियाच्या या हटके मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

* नीतू कपूर म्हणाल्या...

रणबीर आलियाच्या लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे मनापासून आभार मानले. तसेच आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले तेव्हा, नीतू कपूर यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आणि म्हणाल्या सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जा आणि झोपा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT