Alia Bhatt Photo leak Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt Photo leak: पोस्ट शेअर करत अनुष्का शर्माने दिला आलियाला पाठिंबा

आलियाचा पॅपराजीने कोणतीही परवानगी न घेता लिविंग एरिआमधील फोटो काढला आहे.

दैनिक गोमन्तक

एखादी महिला जर कुठे सर्वात जास्त सुरक्षित असेल तर ते तिचे घर असते असे मानले जाते. पण कोणी चोरुन तुम्हाला पाहात आहे हे कळाल्यावर तुम्हाला कसे वाटेल? असेच काहीसे बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्टसोबत घडले आहे. आलिया तिच्या घरातील लिविंग एरिआमध्ये बसली होती. गुपचूप पॅपराजीने तिचे फोटो काढले. ते पाहून आलिया संतापली. या प्रकारावर अनुष्का शर्माने आलियाला पाठिंबा देत संताप व्यक्त केला आहे.

  • काय म्हणाली अनुष्का शर्मा?

अनुष्काने आलियाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत, 'असे हे लोक पहिल्यांदा करत नाहीत. जवळपास दोन वर्षांपूर्वी आम्ही यांना असेच आमचे फोटो काढताना पाहिले होते आणि आम्ही त्यांना चांगलेच सुनावले होते. हे सगळं करुन तुम्हाला इज्जत मिळेल असे वाटते का? अतिशय लज्जास्पद वागणूक आहे

  • नेमकं प्रकरण काय

पापाराजींनी आज सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे फोटो काढण्यासाठी एका न्यूज पोर्टलचे दोन लोक गुपचूप तिच्या घरी पोहोचले. त्यांनी आलियाचे फोटो तिच्या परवानगीशिवाय क्लिक केले आणि सोशल मीडियावर शेअर केले. याची माहिती खुद्द आलिया भट्टने दिली आहे.

Anushka Sharma

आलियाने स्टोरीला फोटो शेअर करत लिहिले की, "खरंच? मी माझ्या घरी होते, माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी बसले होते. तेव्हा मला जाणवले की, कोणीतरी मला पाहत आहे. मी पहिल्यांदा इकडे-तिकडे पाहिले. मात्र, शेजारच्या इमारतीत मला कॅमेरे असलेले दोन लोक दिसले (हॉटेलच्या छतावर). कोणत्या जगात अशा प्रकारचे कृत्य न्याय्य आहे, आणि त्याला परवानगी आहे का? हे एखाद्याच्या गोपनीयतेवर आक्रमण आहे." यासोबत आलियाने Etimes ने शेअर केलेले फोटो देखील पोस्ट केले आहेत.

दुसरीकडे, दादासाहेब फाळके पुरस्कार' हा सिनेविश्वातील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मुंबईतमोठ्या जल्लोषात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामधील भूमिकेसाठी तसेच सिनेविश्वातील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे तर दुसरीकडे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरला 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 

तसेच, आलिया भट्ट हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पांढर्‍या रंगाची साडी परिधान करुन अगदी साध्या लूकमध्ये पोहोचली होती. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यात ती ज्येष्ठ अभिनेत्री रेखासोबत दिसत आहे. आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती पुढे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT